Agriculture news in marathi Bird flu rumors hit poultry business | Agrowon

‘बर्ड फ्लू’च्या अफवांनीच अधिक फटका 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जानेवारी 2021

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या अफवांमुळे जिल्ह्यातील बॉयलर उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. बॉयलरचे दर तब्बल ४० ते ४२ रुपयांनी घसरल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. 

अकोला : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या अफवांमुळे जिल्ह्यातील बॉयलर उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. बॉयलरचे दर तब्बल ४० ते ४२ रुपयांनी घसरल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कुठलाही संसर्ग अद्याप समोर आलेला नाही. राज्यातील इतर ठिकाणच्या अफवा जिल्ह्यात पसरविल्या जात आहेत. अशा स्थितीत अफवांचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योजकांना बसत आहे.

काही दिवसांपूर्वी ९० ते ९२ रुपये किलोचा असलेला दर आता थेट ५० ते ५२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चिक्स (लहान पिल्ले) २० रुपयांपर्यंत मिळत आहे. काही उत्पादकांनी या पूर्वी तब्बल ५३ रुपये दराने पक्षी आणून बॅच टाकलेली आहे. एक पक्षी तयार करण्यासाठी ८५ रुपयांपर्यंत खर्च केलेला आहे. अशा स्थितीत आता अवघे ५० रुपये दराने मागणी होत असल्याने लावलेला खर्च तर सोडाच तब्बल ४० रुपयांपर्यंत किलोमागे तोटा सहन करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे कुक्कुट पालकांनी सांगितले. 

प्रतिक्रिया
आधीच कोरोनाच्या फटक्यातून थोडे सावरत असताना आता बर्ड फ्लूच्या अफवांचा फटका बसत आहे. प्रशासनाने नवीन बॅच टाकण्याबाबत पुढील आदेशापर्यंत थांबण्याची सूचना केली आहे. परंतु आम्ही जो खर्च करून सेटअप उभा केला, त्यासाठी मदतीबाबत, या पूरक उद्योगाला पाठबळ देण्याविषयी कोणी बोलत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. 
-निलेश झोंबाडे, कुक्कुटपालक, अकोला 


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज र्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...