agriculture news in marathi Bird flu survey begins in Khandesh | Agrowon

खानदेशात ‘बर्ड फ्लू’ सर्वेक्षण सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात ‘बर्ड फ्लू’बाबत खबरदारी घेण्यास सुरवात झाली आहे. त्यासंबंधीची पुष्टी कुठेही झालेली नाही. परंतु सर्वेक्षण सुरू झाले आहे. 

जळगाव ः खानदेशात ‘बर्ड फ्लू’बाबत खबरदारी घेण्यास सुरवात झाली आहे. त्यासंबंधीची पुष्टी कुठेही झालेली नाही. परंतु सर्वेक्षण सुरू झाले आहे. 

कुक्कुटपालक व्यावसायिकांशी संपर्क साधून पशुसंवर्धन विभागाने माहिती घेतली आहे. त्यात कुठेही बर्ड फ्लू सदृश आजाराची समस्या अद्याप आढळलेली नसल्याची माहिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुका कुक्कुटपालनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात गेल्या आठवड्यातच सर्वेक्षण सुरू झाले आहे. जळगाव जिल्ह्यात १५ पथके सर्वेक्षणासाठी स्थापन झाली आहेत. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त पथकांचे काम सुरू झाले आहे. 

खानदेशात रोज २० टन चिकनची खरेदी-विक्री केली जाते. सध्याचा हंगाम जोमात असतानाच ‘बर्ड फ्लू’ची समस्या राज्यात विविध भागात आढळल्याने सतर्कता बाळगली जात आहे. परराज्यातून लहान पक्ष्यांची खरेदी, वाहतूक तूर्त बंद आहे. तर परराज्यात चिकनची पाठवणूक थांबली आहे.

स्थानिक क्षेत्रात चिकनची विक्री मात्र सुरू आहे. चिकन विक्रीवर मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या भागात अद्याप बंदी घातलेली नसल्याची माहिती आहे. 

प्रशासनाचे बारीक लक्ष

सर्वेक्षण करून तातडीने त्याची माहिती संबंधित विभागासह जिल्हा प्रशासनाकडे सादर करायची आहे. या संदर्भात यंत्रणा जिल्हा प्रशासनाने सज्ज केली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ही कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती मिळाली. नंदुरबार जिल्ह्यात यंत्रणा अधिक सतर्क आहे. नवापूर तालुक्यातील स्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...