agriculture news in Marathi bird flue in keral Maharashtra | Agrowon

केरळमध्ये ६९ हजार पक्ष्यांना केले ठार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

 देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गुरुवारी तीन सदस्यीय पथक केरळच्या अलप्पुझा आणि कोट्टायाम जिल्ह्यात पोचले. 

नवी दिल्ली ः देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गुरुवारी तीन सदस्यीय पथक केरळच्या अलप्पुझा आणि कोट्टायाम जिल्ह्यात पोचले. या ठिकाणी बर्ड फ्लूला रोखण्यासाठी आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक पक्ष्यांना ठार करण्यात आले आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू आधीच आढळला आहे. 

केरळ सरकारने बुधवारपर्यंत दोन जिल्ह्यांत ६९ हजारांहून अधिक बदक आणि कोंबड्यांना ठार केले. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री के. राजू म्हणाले, की संसर्गबाधित क्षेत्रात चिकन, मटण आणि अंडी विकण्यास मनाई केली आहे. पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. आतापर्यंत अलप्पुझा येथे ६१,५१३, तर कोट्टायाम येथे ७७२९ पक्ष्यांना ठार करण्यात आले आहे. पक्ष्यांना मारल्यामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. 

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा आणि फलोदी भागात बुधवारी सुमारे ५० कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. कर्नाटकातील दक्षिणा आणि कन्नडा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर ६ कावळे मृत अवस्थेत आढळले. या कावळ्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लूच्या वाढत्या संसर्गामुळे मध्य प्रदेशने उत्तरेकडील राज्यांसोबतचा पोल्ट्री व्यापार १० दिवसांसाठी बंद केला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...