agriculture news in Marathi bird flue not identify in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जानेवारी 2021

राज्यात वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत झाल्याचे देखील दिसून आलेले नाही.

पुणे ः राज्यात वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या मांसाहारी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. 

बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पाँग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशांमधून स्थलांतरित झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मर्तूक आढळून आली आहे.

‘निशाद' (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H५N१ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनी शेजारच्या भागामध्ये नमूद रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

राजस्थान राज्यातील झालवाड आणि जोधपूर आणि मध्य प्रदेश राज्यातील इंदौर जिल्ह्यांमध्ये कावळ्यांमध्ये मर्तूक झाली असल्याचे देखील दिसून येते. ‘निशाद’ संस्थेद्वारे या मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H५N८ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान करण्यात आले आहे. 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात.

सन २०२०-२१ मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण १७१५ विष्ठा नमुने, १९१३ रक्तजल नमुने १५४९ घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...