Agriculture news in Marathi, Birhad agitation in Malegaon of onion growers | Agrowon

कांदा उत्पादकांचे मालेगावात बिऱ्हाड आंदोलन 
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नाशिक : कांदा व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) ‘बिऱ्हाड’ आंदोलन केले.

शेतकरी, बाजार समिती व कांदा व्यापारी यांच्यात मोबदल्याच्या पैशांवरून संघर्ष सुरू आहे. मुंगसे येथील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात उडी घेतली आहे. याच धर्तीवर मंगळवारी (ता. १०) येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी प्रशासन, बाजार समिती आणि व्यापाऱ्याचा निषेध नोंदवत सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलक शेतकरी ‘बिऱ्हाड’ आंदोलन करीत तळ ठोकून होते. 

याप्रकरणी काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून तालुक्यात पर्दाफाश आंदोलन सुरू होते. त्याचाच पुढचा टप्पा बिऱ्हाड आंदोलन आहे. आंदोलनाची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले तेथे दाखल झाले. काही शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले. अर्धा तास ठेऊन सुटका करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश ठाकरे, तालुकाध्यक्ष संदीप पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, विनोद चव्हाण, आनंद भोसले आदींसह फसवणूक झालेले शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...