agriculture news in marathi, birth anniversary of Chattrapati Shivaji Maharaj celebrated on Shivneri | Agrowon

शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे. दुष्काळग्रस्त आणि गरजवंत अशा ५० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, ही प्रक्रिया अजून चालू आहे. शिवछत्रपती राज्य कारभाराच्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे. दुष्काळग्रस्त आणि गरजवंत अशा ५० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, ही प्रक्रिया अजून चालू आहे. शिवछत्रपती राज्य कारभाराच्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

शिवनेरी किल्ल्यावर (ता. जुन्नर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवारी (ता.१९) पार पडला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जातिधर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्या प्रेरणेनेच राज्य सरकार विविध प्रश्न मार्गी लावत आहेत.''

मुख्यमंत्री म्हणाले,''मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरित गुन्हे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.''

''छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वांत महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देऊ शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तर शिवाजी महाराज यांचे गड किल्ले संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आत्तापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. याच धर्तीवर राज्यातील इतर महत्त्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सुरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, '' असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिवजन्मस्थळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी काही वेळ पालखी खांद्यावर घेतली. महिला पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेजीम पथकाच्यावतीने पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले. उत्सवाला राज्याच्या कानाकाोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी गड फुलून गेला होता.

सोहळ्याचे क्षणचित्रे...

Image may contain: one or more people, people on stage, crowd and outdoor

Image may contain: 14 people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 9 people, people standing

Image may contain: one or more people, sky and outdoor

दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार
जुन्नर तालुक्यातील दाऱ्या  घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल,  असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे केले. हायब्रीड अॅ न्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा प्रारंभ येथे करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले , आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. अष्टविनायक हे आपले वैभव आहे. भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील,असे सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक...औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...