agriculture news in Marathi, birth of buffalo calf by using sexel Technic, Maharashtra | Agrowon

सेक्‍सेल सिमेन तंत्राने रेडीचा जन्म
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

भिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस एबीएसच्या ‘ब्रह्मा' प्रकल्पात सेक्‍सेल सिमेन तंत्रज्ञानातून जगातील पहिल्या म्हशीच्या रेडीचा जन्म झाला. तिचे नाव ‘दुर्गा’ असे ठेवले आहे. जिनोमिक तंत्रज्ञानावर आधारित सेक्‍सेल सिमेनचा वापर केल्याने येत्या काळात ९० टक्के कालवडी किंवा रेडींचा जन्म शक्य आहे.

भिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस एबीएसच्या ‘ब्रह्मा' प्रकल्पात सेक्‍सेल सिमेन तंत्रज्ञानातून जगातील पहिल्या म्हशीच्या रेडीचा जन्म झाला. तिचे नाव ‘दुर्गा’ असे ठेवले आहे. जिनोमिक तंत्रज्ञानावर आधारित सेक्‍सेल सिमेनचा वापर केल्याने येत्या काळात ९० टक्के कालवडी किंवा रेडींचा जन्म शक्य आहे.

चितळे आणि जिनस एबीएस या संयुक्त कंपनीने देशातील गाई आणि म्हशींची अनुवंशिकता सुधारण्यासाठी २०१५ मध्ये पहिला अनुवंशिक कृत्रिम रेतन प्रकल्प सुरू केला. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत कृषिक्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीमधील हा प्रकल्प आहे. कंपनीने हरियाना, पंजाब, कर्नाटक राज्यासह व्हिएतनाम, श्रीलंकेमध्ये सिमेन निर्यातीस सुरवात केली आहे. दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख रेतमात्रा वितरित होतात.

सध्या कंपनीकडे म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा आणि गाईच्या जर्सी, होल्स्टिन फ्रिजियन, गीर, सहिवाल, रेडसिंधी जातीचे गुणवत्तापुर्ण वळू आहेत.  ‘ब्रह्मा’ प्रकल्पाबद्दल चितळे जिनसचे संचालक विश्वास चितळे म्हणाले की, अमेरिकेत गाईच्या वेताची दूध उत्पादन क्षमता बारा हजार लिटर, तर भारतात ती अवघी १२०० लिटर आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने अमेरिकेतून उच्च वंशावळीचे जनुकीय तपासणी झालेले निवडक होल्स्टिन फ्रिजीयन वळू आणले आहेत. हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

   सेक्‍सेल सिमेनचा वापर आपल्याकडील गाई, म्हशींमध्ये केल्याने उत्कृष्ट वंशावळ, जादा दुग्धोत्पादन, चांगली रोगप्रतिकारकता, भारतातील हवामान आणि खाद्याशी जुळते घेण्याची क्षमता, जादा वेत अशा गुणांनी परिपूर्ण दुधाळ गाई, म्हशींची पिढी आपल्या गोठ्यात तयार तयार होते आहे. सेक्‍सेल सिमेन तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे  गाई, म्‍हशींचे संख्या कमी झाली, तरी गोठ्यात नव्याने तयार होणाऱ्या गाई, म्हशींपासून दूध उत्पादनात चांगली वाढ होणार आहे. पर्यायाने पशुपालकांचा फायदा होणार आहे.

आमच्या  ‘ब्रह्मा’ प्रकल्पांतर्गत मुऱ्हा जातीच्या म्हशीमध्ये महाबली रेड्याच्या सेक्‍सेल सिमेनमात्रेद्वारे जगातील पहिली रेडी जन्माला आली.उद्योजक काकासाहेब चितळे म्हणाले की, डेअरीच्या ‘काऊज टू क्‍लाउड` उपक्रमामध्ये २५ हजार दुभत्या गाई, म्हशींची वंशावळीसह संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या उपक्रमात सहभागी असलेल्या पशुपालकांना तांत्रिक माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. या नोंदीमुळे गाई, म्हशींच्या खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

या प्रकल्पाबाबत संचालक अनंत चितळे म्हणाले की, पशुपालनातील ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसाय निश्‍चित किफायतशीर होईल.
 

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...