केकऐवजी फळे कापून वाढदिवस केला साजरा 

वाढदिवस साजरा करताना हजारो रुपयांचा केक कापून तो साजरा करण्याची प्रथा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे.
birthday celebration
birthday celebration

नांदेड : वाढदिवस साजरा करताना हजारो रुपयांचा केक कापून तो साजरा करण्याची प्रथा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. याला बगल देऊन नांदेड शहरातील विठोबा नैसर्गिक भाजीपाला व फळे उत्पादक परिवारातील महिला सदस्या सविता पावडे यांचा वाढदिवस केकऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक फळे कापून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्यानंतर समाज माध्यमांवर अनुकूल प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

शेतकऱ्यांनी सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे, भाजीपाला, शेतीमाल थेट ग्राहकांना मिळावा. यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही लाभ व्हावा, हीच चळवळ अधिकाधिक गतिमान व्हावी, यासाठी गेल्या एक वर्षापासून विठोबा परिवार निरंतरपणे प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे या चळवळीला पाठबळ मिळत आहे. 

दरम्यान, बुधवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत फळे विक्री स्टॉलचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित श्री. चलवदे, एकनाथराव पावडे यांनी शेतकऱ्यांपासून टरबूज, खरबूज, पपई, मोसंबी, पेरू विकत घेऊन विठोबा परिवारातील सदस्या सविता पावडे यांचा त्याच दिवशी (बुधवारी) असलेल्या वाढदिवस केकऐवजी फळे कापून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

या अनोख्या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उद्योग अधिकारी जितेंद्र देशमुख, जीएसटीचे सहायक आयुक्त एकनाथ पावडे, राजमुद्राचे संगमेश्‍वर लांडगे, प्रगतीतील शेतकरी प्रकाश पाटील, ज्ञानेश्‍वर पावडे, दिलीप पावडे, उद्योजक उद्धव पावडे, प्रा. साहेबराव पावडे, वैशाली पावडे तथा परिवारातील सदस्य उपस्थित होते. 

प्रतिक्रिया  वाढदिवसाचा सोहळा अधिक पर्यावरणस्नेही करण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे. युवावर्गापर्यंत अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संदेश पोहोचविणे गरजेचे ठरेल.  - डॉ. परमेश्‍वर पौळ, पर्यावरण व जलतज्ज, नांदेड 

फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा विठोबा परिवारातील सर्वच सदस्यांनी पाळण्याचे ठरविले आहे. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व समाजामध्ये आरोग्यभान निर्माण करण्यासाठी ‘विठोबा’चा हा उपक्रम यशस्वी ठरेल याची खात्री आहे.  - सतीश कुलकर्णी- मालेगावकर, विठोबा चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता 

वृक्षमित्र चळवळीतील कार्यकर्ते यापुढील काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी फळांचाच समावेश करणार असून, समाजातील विविध घटकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.  - संतोष मुगटकर, वृक्षमित्र चळवळीचे प्रणेते 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com