सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप आक्रमक

BJP aggressive on Savarkar's glorious proposal
BJP aggressive on Savarkar's glorious proposal

मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावरून विधानसभेत भाजप आमदार आक्रमक झाले होते. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा, अशी मागणी लावून धरली, त्यासाठी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सावकरांचा गौरव प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांना बलात्कारी म्हटले आहे, माफीवीर म्हटले आहे, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटते. सावरकरांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अध्यक्षांना प्रस्ताव देत सत्तापक्षाने दोन ओळींचा सावरकर गौरव प्रस्ताव मांडावा, अशी मागणी केली. या वेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

मंत्री अनिल परब म्हणाले, ‘‘सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमचा प्रस्ताव आणि पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन केले. सावरकरांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हीसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही माहीत नाही. दोन वेळा देवेंद्र फडवणीस यांनी पत्र दिले आहे, पाच वर्षे त्यांचे सरकार होते, मात्र आजच गौरव प्रस्ताव का? सावरकरांचे योगदान आहे, पण त्यांच्याबाबत वेगवेगळी मते आहेत. सावरकर विज्ञानवादी होते, गाय-बैलांबाबत त्यांचे मत काय होते हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकाची आपापली मते असू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com