Agriculture news in Marathi BJP aggressive on Savarkar's glorious proposal | Agrowon

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप आक्रमक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावरून विधानसभेत भाजप आमदार आक्रमक झाले होते. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा, अशी मागणी लावून धरली, त्यासाठी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावरून विधानसभेत भाजप आमदार आक्रमक झाले होते. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा, अशी मागणी लावून धरली, त्यासाठी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सावकरांचा गौरव प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांना बलात्कारी म्हटले आहे, माफीवीर म्हटले आहे, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटते. सावरकरांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अध्यक्षांना प्रस्ताव देत सत्तापक्षाने दोन ओळींचा सावरकर गौरव प्रस्ताव मांडावा, अशी मागणी केली. या वेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

मंत्री अनिल परब म्हणाले, ‘‘सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमचा प्रस्ताव आणि पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांचे निवेदन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन केले. सावरकरांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हीसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही माहीत नाही. दोन वेळा देवेंद्र फडवणीस यांनी पत्र दिले आहे, पाच वर्षे त्यांचे सरकार होते, मात्र आजच गौरव प्रस्ताव का? सावरकरांचे योगदान आहे, पण त्यांच्याबाबत वेगवेगळी मते आहेत. सावरकर विज्ञानवादी होते, गाय-बैलांबाबत त्यांचे मत काय होते हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकाची आपापली मते असू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.


इतर बातम्या
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...