संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन 

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन 
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन 

अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण कर्जमाफी, दुष्काळी मदतीबाबत शब्द न पाळल्याबद्दल तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने वऱ्हाडात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अकोल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. आंदोलन कर्त्यांनी यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले.  सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com