agriculture news in marathi BJP boycotts Jalgaon district bank elections | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला आहे. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला आहे. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीच्या अंतिम दिवशी विविध कार्यकारी सोसायटीच्या १५ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. चार विविध कार्यकारी सोसायटी व सहा राखीव मतदारसंघात लढत होत आहे. 

अर्ज माघार घेण्याची सोमवारी (ता. ८) अंतिम मुदत होती. भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. जामनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून आमदार गिरीश महाजन, तर जळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे यांनी माघार घेतली. पण भुसावळा सोसायटी मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी माघार घेतलेली नाही. तर तांत्रिक कारणामुळे भुसावळातून माघार होवू शकली नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश भोळे यांनी दिले. 

बिनविरोध उमेदवार ः 
जळगाव : जयश्री सुनील महाजन महापौर (शिवसेना), मुक्ताईनगर : एकनाथ खडसे (राष्ट्रवादी), चाळीसगाव : प्रदीप रामराव देशमुख (राष्ट्रवादी), पाचोरा : आमदार किशोर धनसिंग पाटील (शिवसेना), धरणगाव : संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), बोदवड : रवींद्र प्रल्हादराव पाटील (राष्ट्रवादी), भडगाव : प्रताप हरी पाटील, पारोळा : आमदार चिमणराव रूपचंद पाटील (शिवसेना), एरंडोल : अमोल चिमणराव पाटील (शिवसेना), जामनेर : नाना राजमल पाटील (राष्ट्रवादी), अमळनेर : आमदार अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी). 

या मतदारसंघात होणार लढत 

  • विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ : चोपडा- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल, सुरेश श्‍यामराव पाटील, संगीताबाई प्रदीप पाटील, भुसावळ-आमदार संजय वामन सावकारे, शांताराम पोपट धनगर, यावल-विनोदकुमार पंडितराव पाटील, प्रशांत लिलाधर चौधरी, गणेश गिरधर नेहते, रावेर-अरुण पांडुरंग पाटील, जनाबाई गोंडू महाजन, राजीव रघुनाथ पाटील,
  • विमुक्त जाती ः भटक्या जमाती- मेहताबसिंग रामसिंग नाईक, विकास ज्ञानेश्‍वर वाघ,
  • अनुसूचित जाती, जमाती ः श्‍यामकांत बळीराम सोनवणे, प्रकाश यशवंत सरदार, नामदेव भगवान बाविस्कर,
  • इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार, डॉ. सतीश भास्करराव पाटील, प्रकाश जगन्नाथ पाटील, राजीव रघुनाथ पाटील,
  • महिला राखीव ः कल्पना शांताराम पाटील, अरुणा दिलीपराव पाटील, ॲड. रोहिणी खडसे खेवलकर, शैलजादेवी दिलीपराव निकम, शोभा प्रफुल्ल पाटील, सुलोचना भगवान पाटील,
  • इतर संस्था मतदारसंघ ः गुलाबराव बाबूराव देवकर, प्रकाश जगन्नाथ पाटील, प्रकाश यशवंत सरदार, उमाकांत रामराव पाटील, रवींद्र सूर्यभान पाटील. 

विश्‍वासघात, दडपशाहीचा निषेध : महाजन 
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला, याबाबत भाजप नेते आमदार गिरीश महाजन म्हणाले, की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला भाजपनेही सहमती दर्शविली होती. आमच्या बैठका झाल्या. मात्र ऐनवेळी तिन्ही पक्षांनी विश्‍वासघात केला व सर्वपक्षीय पॅनेलला नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यावर दबाव आणून आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले. नाशिक येथील अधिकाऱ्यांनीही आमचे ऐकले नाही. 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...