भाजपचा राज्यात प्रचाराचा धडाका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून, आगामी काळात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा, तसेच रोड शो घेण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून, त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २४ मार्चला कोल्हापुरात प्रचाराला सुरवात केली असून त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा राज्यात होतील.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात राज्यात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचार सभांमध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते राज्यातील सर्व मतदारसंघांत सभा घेणार आहेत. त्याशिवाय मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहेत.

या नेत्यांशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सैयद शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी हे देखील प्रचार सभा घेणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com