भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवार यादी मंगळवारी (ता. १) जाहीर केली. १२५ उमेदवारांच्या या यादीत भाजपने ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.  भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्याने भाजपने अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर भाजपने मंगळवारी सकाळी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजपच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. विरोध असतानाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. गिरीश बापट खासदार झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विद्यमान मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा समावेश नाही. नवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना उमेदवारी न देता बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. 

भाजपची पहिली यादी अशी  : नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस, कोथरूड - चंद्रकांत पाटील, नंदुरबार - विजयकुमार गावित, नवापूर - भारत गावित, रावेर - हरिभाऊ जावळे, भुसावळ - संजय सावकारे, अकोला (प.) - गोवर्धन शर्मा, अकोला (पू.) - रणधीर सावरकर, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा पेठ - मुक्ता टिळक, कराड दक्षिण - अतुल भोसले, बेलापूर - मंदा म्हात्रे, विलेपार्ले - पराग अळवणी, जामनेर - गिरीश महाजन, वडाळा (मुंबई) - कालिदास कोळंबकर, पुणे पर्वती - माधुरी मिसाळ, घाटकोपर (प.) - राम कदम, जळगाव जामोद - संजय कुटे, शहादा - राजेश पाडवी, जळगाव शहर - सुरेश भोळे, सिंदखेडा - जयकुमार रावल, धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती बदाणे, अमळनेर - शिरीष चौधरी, चाळीसगाव - मंगेश चव्हाण, माण - जयकुमार गोरे, परळी - पंकजा मुंडे, तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील, अकोले - वैभव पिचड, राहुरी - शिवाजीराव कर्डिले, औसा - अभिमन्यू पवार, वांद्रे पश्चिम - आशिष शेलार, नाशिक मध्य - देवयानी फरांदे, ऐरोली - संदीप नाईक, शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील, इंदापूर - हर्षवर्धन पाटील, अमरावती - सुनील देशमुख, वर्धा - पंकज भोयर, मूर्तिजापूर - हरीश पिंपळे,पुणे कँटोन्मेंट - सुनील कांबळे, वाशीम - लखन मलिक, कारंजा - राजेंद्र पटणी, दर्यापूर - रमेश बुंदिले, मोर्शी - डॉ. अनिल बोंडे, आर्वी - दादाराव केंचे, हिंगणघाट - समीर कुणावार, उमरखेड - सुधीर पारवे, हिंगणा - समीर मेघे, राजुरा - संजय धोत्रे, आमगाव - संजय पूरम, मलकापूर - चैनसुख संचेती, चिखली - श्वेता महाले, खामगाव - आकाश फुंडकर, अकोट - प्रकाश भारसाकळे, सावनेर - राजीव पोतदार, नागपूर दक्षिण - मोहन मते, नागपूर मध्य - विकास कुंभारे, नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर - मिलिंद माने, अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले, तिरोरा - विजय रहांगडाले, आरमोरी - कृष्णा गजभे, गडचिरोली - देवराव होळी, चंद्रपूर - नाना शामकुळे, बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार, चिमूर - कीर्तिकुमार भांगडिया, वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार, राळेगाव - अशोक उइके, यवतमाळ - मदन येरावार, आर्णी - संदीप धुर्वे, भोकर - बापूसाहेब गोर्ठेकर, मुखेड - तुषार राठोड, हिंगोली - तानाजी मुटकुळे, परतूर - बबनराव लोणीकर,बदनापूर - नारायण कुचे, भोकरदन - संतोष दानवे-पाटील, फुलंब्री - हरीभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, गंगापूर - प्रशांत बंब, चांदवड - राहुल आहेर, नाशिक पश्चिम - सीमा हिरे, डहाणू - पास्कल धानरे, विक्रमगड - हेमंत सावरा, भिवंडी पश्चिम - महेश चौघुले, मुरबाड - किसन कथोरे, कल्याण पूर्व - गणपत गायकवाड, डोंबिवली - रवींद्र चव्हाण, मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता, ठाणे - संजय केळकर, दहिसर - मनीषा चौधरी, मुलुंड - मिहीर कोटेचा, कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर, चारकोप - योगेश सागर, गोरेगाव - विद्या ठाकूर, सायन कोळीवाडा - तामीळ सेल्वन, मलबार हिल - मंगलप्रभात लोढा, पनवेल - प्रशांत ठाकूर, पेण - राजीवशेठ पाटील, शिरूर - बाबूराव पाचर्णे, चिंचवड - लक्ष्मण जगताप, भोसरी - महेश लांडगे, वडगाव शेरी - जगदीश मुळीक, शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला - भीमराव तापकीर, हडपसर - योगेश टिळेकर, कोपरगाव - स्नेहलता कोल्हे, नेवासा - बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव - मोनिका राजळे, श्रीगोंदा - बबनराव पाचपुते, कर्जत जामखेड - राम शिंदे, गेवराई - लक्ष्मण पवार, माजलगाव - रमेश अडसकर, आष्टी - भीमराव धोंडे, अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील, निलंगा - संभाजी पाटील-निलंगेकर, सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख, सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख, वाई - मदन भोसले, कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक, इचलकरंजी - सुरेश हाळवणकर, मिरज - सुरेश खाडे, सांगली - सुधीर गाडगीळ, शिराळा - शिवाजीराव नाईक, जत - विलासराव जगताप.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com