agriculture news in marathi, bjp declared manifesto, mumbai, maharashtra | Agrowon

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासोबतच, निसर्गावर अवलंबून असणारी शेती शाश्वत शेतीकडे नेऊन राज्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही आमची संकल्पना आहे. यावर आम्ही एक रोड मॅप तयार केला आहे. त्यातून रोजगारासह सर्व विषयांवर भर देण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासोबतच, निसर्गावर अवलंबून असणारी शेती शाश्वत शेतीकडे नेऊन राज्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही आमची संकल्पना आहे. यावर आम्ही एक रोड मॅप तयार केला आहे. त्यातून रोजगारासह सर्व विषयांवर भर देण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मंगळवारी (ता. १५) पक्षाचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपने हा जाहीरनामा प्रकाशित केला. या वेळी श्री. फडणवीस बोलत होते.  

वीजपुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशक विकास, राज्याचा वारसा, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास, रेल्वे विकास, शेती सुविधा, रस्ते विकास आदींविषयी या जाहीरनाम्यातून घोषणांचा वर्षाव करण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटले आहे.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे भाजपचे लक्ष्य आहे. या संकल्पपत्रात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. भविष्यातील आव्हानांचा विचार करून भाजपने संकल्पपत्र तयार केले आहे. गेल्या पाच वर्षांत जे काम झाले त्याचा अनुभव, विविध समस्यांना सामोरे जात असताना त्याची उत्तरे आणि भविष्यातल्या गोष्टी या संकल्पपत्रात आहेत. कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 
संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

 • दुष्काळग्रस्त भागात पाणी पोचवणार आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार.
 • कोकणातील पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा संकल्प.
 • नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार.
 • शेतीला बारा तास वीजपुरवठा करणार.
 • १,००० मेगावॅटचे पवनऊर्जा प्रकल्प, १,५०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणार.
 •  गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान देणार.
 • बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा संरक्षण.
 • शेतीकर्ज सवलतीच्या दराने कायमस्वरूपी मिळणार.
 •  इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देणार.
 • ‘ई-नाम’द्वारे शेतीमालाला जास्तीचा दर देणार.
 • मासेमारीसाठी कमी दरात कर्ज व विक्रीसाठी आधुनिक सुविधा.
 • एक कोटी लोकांना रोजगार देणार.
 • राज्यातील ८ शहरांत नवीन विमानतळ सुरू होणार, शेतीमाल निर्यातीसाठी विमानसेवा विकसित होणार.
 • पाचवीपासून शेतीवर आधारीत अभ्यासक्रम, राज्यात नव्या आयआयटी, आयआयएम, एम्स संस्था उभारणार.
 •  एक कोटी महिलांना बचतगटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार.
 • प्रत्येक बेघराला २०२२ पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचे पाणी देणार.
 • राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार.
 • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार. त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसरा टप्प्यातून ३० हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बनवणार. 
 • शेतकऱ्यांसाठी शेतात जाणारा रस्ता पाणंद रस्ता म्हणून मजबूत करणार.
 • राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार.

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...