agriculture news in marathi, BJP Delhi meet plans for 2019 General elections | Agrowon

फिर एक बार मोदी सरकार : भाजपच्या बैठकीत लोकसभेचा बिगुल
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा पक्षपातळीवर बिगुल फुंकला आहे. आगामी निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठे यश मिळविण्याचा निर्धार राज्याराज्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) व्यक्त केला. दिल्लीतील बैठकीत "मेरी सरकार अच्छी सरकार' व "फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांचा उद्‌घोष झाला. नमो ऍपचा वापर जास्तीत जास्त करा, असे उपस्थितांना बजावण्यात आले. "भाजप विजयामागून विजय मिळवत असला, तरी आत्मगौरवाचे रूपांतर आत्मसंतुष्टीत होऊ न देता पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा पक्षपातळीवर बिगुल फुंकला आहे. आगामी निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठे यश मिळविण्याचा निर्धार राज्याराज्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) व्यक्त केला. दिल्लीतील बैठकीत "मेरी सरकार अच्छी सरकार' व "फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांचा उद्‌घोष झाला. नमो ऍपचा वापर जास्तीत जास्त करा, असे उपस्थितांना बजावण्यात आले. "भाजप विजयामागून विजय मिळवत असला, तरी आत्मगौरवाचे रूपांतर आत्मसंतुष्टीत होऊ न देता पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय व राज्यांचे सारे पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, कार्यालयप्रमुख, संघटनमंत्री यांची ही बैठक दिवसभर झाली. नंतर बहुतांश नेत्यांनी फोन स्वीच ऑफ करून टाकले. तीन टप्प्यांत झालेल्या या बैठकीचे उद्‌घाटन व समारोप करताना शहा यांनी यंदा होणाऱ्या तीन राज्यांच्या व नंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजपच्या राज्य शाखांच्या कामांचा व प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज भाजप कार्यालय या योजनेचा आढावा घेण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या पूर्ततेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रत्येकाने सूचना द्याव्यात असा दंडक घालून देण्यात आला होता. 20 हजार गावांत, विशेषतः त्या गावांतील दलितांच्या घरी मुक्कामी रहाणे हे उद्दिष्ट किती मंत्र्यांनी, नेत्यांनी पूर्ण केले, याचाही सविस्तर आढावा घेतला गेला.
---
तीन मोठे कार्यक्रम
आगामी महिनाभरात भाजप तीन मोठे कार्यक्रम घेणार आहे, त्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ते असे ः 17 मे- भाजपच्या सर्व आघाड्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारी बैठक, 26 मे- मोदी सरकारची चौथी वर्षपूर्ती, जूनमध्ये श्‍यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी ते जागतिक योग दिन या दरम्यान होणारे उपक्रम.
---
भाजप विरुद्ध झाडून सारे, अशी जी धडपड सुरू आहे, त्यातच भाजपच्या आगामी यशाची बीजे दडली आहेत.
- अमित शहा, भाजपचे अध्यक्ष 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...