भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर वर्चस्व
जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. विविध शहरातून विजयी मिरवणुका काढण्यात आल्या.
जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरित ६६ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला झाली. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल आल्यापासून कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळविण्यास सुरूवात केली.
दुपारी दीड वाजता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे निकाल प्राप्त झाले. दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान ६६ पैकी ४४ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील १७, वैभववाडीतील ९ सह इतर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. शिवसेनेने २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त केले आहे. चार ग्रामपंचायतीवर स्थानिक पॅनेलची सत्ता प्राप्त झाली आहे. दोन्ही पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निवडणुकीचे निकाल प्राप्त होताच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. पक्ष कार्यालयांसमोर फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या काही ग्रामपंचायती भाजपने तर भाजपच्या ताब्यात असलेल्या काही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने मिळविल्या आहेत. निवडणूक निकालानंतर विविध शहरांमधून विजयी मिरवणुका काढण्यात आल्या.