Agriculture news in marathi BJP dominates 44 gram panchayats, Shiv Sena dominates 22 gram panchayats | Page 2 ||| Agrowon

भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर वर्चस्व 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. विविध शहरातून विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. 

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरित ६६ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला झाली. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल आल्यापासून कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळविण्यास सुरूवात केली. 

दुपारी दीड वाजता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे निकाल प्राप्त झाले. दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान ६६ पैकी ४४ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील १७, वैभववाडीतील ९ सह इतर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. शिवसेनेने २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त केले आहे. चार ग्रामपंचायतीवर स्थानिक पॅनेलची सत्ता प्राप्त झाली आहे. दोन्ही पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

निवडणुकीचे निकाल प्राप्त होताच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. पक्ष कार्यालयांसमोर फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या काही ग्रामपंचायती भाजपने तर भाजपच्या ताब्यात असलेल्या काही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने मिळविल्या आहेत. निवडणूक निकालानंतर विविध शहरांमधून विजयी मिरवणुका काढण्यात आल्या.


इतर ताज्या घडामोडी
सांगली : बाजार समिती संचालकांना ...सांगली : येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची सरासरी २३००...औरंगाबाद : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुढील हंगामापर्यंत इथेनॉल प्रकल्प सुरू...चिंचखेड, ता. दिंडोरी : ‘‘‘कादवा’ला लेखापरीक्षनात...
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा...मंगळवेढा, जि. सोलापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित...
हळदीचे दर चांगले; मात्र उत्पादनात घट अकोला : हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून गेल्या...
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...