भाजपची मोहिते-पाटील, पडळकर यांना उमेदवारी 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे.
assembly
assembly

मुंबई : येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भांडारी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे.  विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचे चित्र दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांसारख्या नेत्यांच्या नावावर पुन्हा एकदा फुली मारली आहे.  लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोघांना भाजपने विधान परिषदेला संधी देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.  भाजपातील या घडामोडींमुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या बड्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबले आहे. कोरोनामुळे रखडलेल्या विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २१ मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com