agriculture news in marathi, BJP government responsible for Farmer crisis in country : Rahul Gandhi | Agrowon

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी थकविले : राहुल गांधी

वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

नवी दिल्ली : देशातील कृषिक्षेत्रातील संकटाला भाजपचे सरकार जबाबदार असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज डागले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल ११ हजार कोटी रुपये थकविले असून, दुसरीकडे ३० हजार कोटी रुपये बड्या उद्योगपतींच्या खशात घातले असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : देशातील कृषिक्षेत्रातील संकटाला भाजपचे सरकार जबाबदार असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज डागले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल ११ हजार कोटी रुपये थकविले असून, दुसरीकडे ३० हजार कोटी रुपये बड्या उद्योगपतींच्या खशात घातले असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी केला.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ११ हजार कोटी थकविले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. गांधी यांनी म्हटले आहे, की वर्षभर शेतात राबून शेतकरी उसाचे पीक घेतो. हा ऊस साखर कारखान्यांमध्ये गेल्यानंतर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी ऊस उत्पादकांचे सुमारे ११ हजार कोटी रुपये थकविले आहेत. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला, एका बड्या उद्योगपतीने दहा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंत्राट देत ३० हजार कोटी रुपये त्या उद्योगपतीच्या खिशात टाकले. चालू वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी २० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा दावाही गांधी यांनी केला आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...