भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे स्वागत : मुख्यमंत्री

भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे स्वागत : मुख्यमंत्री
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे स्वागत : मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या निरंजन डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग असून, त्यासाठी थोडा वेळ वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी (ता. २३) ''राष्ट्रवादी''ला धक्‍का दिला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी ''राष्ट्रवादी''च्या आमदारकीचा राजीनामा देत भापजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. गुरुवारी (ता. २४) त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपमध्ये निरंजन डावखरे यांचे स्वागत आहे. निरंजन यांच्या सहभागाने भाजपला मोठा फायदा होणार आहे. डावखरेंच्या तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी डावखरे यांना उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करण्यात येईल. भाजपच्या संपर्कात आणखी अनेक नेते असून, रांगेत उभे आहेत. त्यासाठी आणखी थोडा वेळ वाट बघा. निरंजन डावखरे म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून मी हे पाऊल उचलले आहे. पदवीधर आणि शिक्षकांसाठी काम करता येईल. शरद पवार मोठे नेते आहेत, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे. निरंजन तुला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही : अजित पवार ‘‘राष्ट्रवादीत असताना पहिला युवक आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी दिली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले; पण आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,’ अशी अगतिकता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार निरंजन डावखरे यांना निरोप देताना व्यक्‍त केली. विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी "राष्ट्रवादी''ला धक्‍का दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com