BJP Kisan Morcha should do constructive work for farmers: Chandrakant Patil
BJP Kisan Morcha should do constructive work for farmers: Chandrakant Patil

भाजपा किसान मोर्चाने शेतकऱ्यांसाठी रचनात्मक काम करावे ः चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी रचनात्मक काम उभे करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

नागपूर : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी रचनात्मक काम उभे करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजपा किसान मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मोर्चाचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते.

किसान मोर्चाच्या पहिल्याच ऑनलाइन बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचा परिचय करून घेत त्यांना कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र शासनाने  पिकांच्या हमीभावात नुकतीच केलेली वाढ, कृषी विषय शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल कुठेही विकता येईल याबाबत केलेला निर्णय यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील बहुतांश जनता मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना अद्ययावत तंत्रज्ञान शेती क्षेत्रात केंद्र सरकार घेत असलेले लोकाभिमुख निर्णय याबाबत अवगत करण्याचे काम किसान मोर्चाच्या संघटनेने जिल्हा स्तरावर पोहोचवणे आवश्यक आहे. केवळ आंदोलने करून रचनात्मक काम उभे करता येत नाही असे ते म्हणाले.

किसान मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करताना आपल्यातील क्षमता आणि अनुभव याचा उपयोग संघटनेची ताकद वाढवण्यासाठी करावा असे आवाहन प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी ‘मेरा घर मेरा रणांगण’, दुधाच्या भाववाढीसाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले. यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी राज्य सरकार प्रत्येक पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असमर्थ ठरत असल्यामुळे भाजपा किसान मोर्चा वर मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन मोर्चाचे सरचिटणीस मकरंद कोरडे यांनी केले.

पीक विमा, पंचनामे, त्यात होत असलेली दिरंगाई, कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांच्या समोर आहेत. त्यासाठी ही भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर प्रयत्न करावेत. - डॉ. अनिल बोंडे, प्रदेश अध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com