राज्य सहकारी संघावर भाजपप्रणीत पॅनेलचे वर्चस्व

पुणे ः राज्य सहकारी संघाच्या पदाधिकारी निवडीनंतर जल्लोष करताना आमदार प्रवीण दरेकर आणि पदाधिकारी.
पुणे ः राज्य सहकारी संघाच्या पदाधिकारी निवडीनंतर जल्लोष करताना आमदार प्रवीण दरेकर आणि पदाधिकारी.

पुणे  ः राज्य सहकारी संघावर अखेर भाजपप्रणीत पॅनेलला यश आले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविराेध झाले.  डॉ. प्रताप पाटील अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ पठाडे यांची वर्णी लागली,  तर कॉँग्रेसच्या विद्या पाटील मानद सचिवपदी विजयी झाल्या.

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, मुंबई सहकारी बॅंकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालच्या सहकार पॅनेलचा झेंडा फडकला आहे. संघाच्या पदाधिकारी निवडीची मंगळवारी (ता. १०) सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी काम पाहिले. 

या वेळी बाेलताना आमदार दरेकर म्हणाले, ‘सहकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही निवडणूक लढवली. ही निवडणूक लढवीत असताना, सर्व पक्षीय सदस्य एकत्रित लढलाे. या निवडणुकीत आमच्या पॅनेलचे डॉ. प्रताप पाटील आणि सिद्धार्थ पठाडे बिनविराेध निवडून आले. तर मानद सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत विद्या पाटील विजयी झाल्या. त्यांनी हिरामण सातकर यांचा पराभव केला. या संस्थेची स्थावर मालमत्ता आम्ही खासगी विकासकाला देणार नसून, संस्था पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.''   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com