agriculture news in marathi, bjp meeting on drought situation, mumbai, maharashtra | Agrowon

आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी सुविधा देणार ः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार निधीतून सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून शासन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टाकी, चारा छावणी, टँकर आदी सुविधा दिल्या जातील.भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक मंगळवारी (ता. २१) मुंबई येथे पार पडली. या वेळी श्री. मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतानाच राज्यातील दुष्काळी स्थितीवर चर्चा करण्यात आली. 

मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार निधीतून सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून शासन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टाकी, चारा छावणी, टँकर आदी सुविधा दिल्या जातील.भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक मंगळवारी (ता. २१) मुंबई येथे पार पडली. या वेळी श्री. मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतानाच राज्यातील दुष्काळी स्थितीवर चर्चा करण्यात आली. 

या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, डॉ. रामदास आंबटकर, संजय कुटे आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पक्षाचे खासदार, आमदार दुष्काळी भागातील चारा छावण्यांना भेट देतील, पाणीटंचाईच्या स्थितीचा आढावा घेतील. सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक निर्णय घेतले असून, त्याच्या अंमलबजावणीचा आढावा लोकप्रतिनिधी घेतील. दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी आमदार निधीतून पैसे खर्च करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार विशेष बाब म्हणून सरकार शासन आदेश जारी करेल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी संघटनेने प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळी स्थिती आणि त्यावर सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...