Agriculture news in marathi BJP members in Dhule Run to the Supreme Court | Page 2 ||| Agrowon

धुळ्यातील भाजप सदस्यांची सर्वोच्‍च न्यायालयात धाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने सर्वाधिक जागा  असलेल्या भाजप सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

सोनगीर, जि. धुळे : धुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १५ जागांसाठी नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यात निकालाचे तीव्र पडसाद उमटले. नवीन निवडणूक होणाऱ्या जागा सर्वाधिक भाजपच्या ताब्यात असल्याने भाजप श्रेष्ठींसह सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे काय निर्णय होतो यावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. 

जिल्हा परिषद सदस्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये झाली. त्यात अनुसूचित जातीसाठी तीन, अनुसूचित जमातीला २३, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १५ जागा होत्या. उर्वरित १५ जागा खुल्या होत्या. एकूण राखीव जागा ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको, अशी तरतूद आहे. मात्र आरक्षण ७३.२१ टक्के झाले आहे. ओबीसी संवर्गाला २७ टक्के आरक्षण लागू आहे. त्यानुसार १५ जागा राखीव होत्या. अनुसूचित जाती व जमातीच्या एकूण राखीव जागा २६ होतात. मग ओबीसींना फक्त दोनच जागा राखीव उरतात. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत दोन जागांवर ओबीसींना समाधान मानावे लागेल. म्हणूनच या आधारावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहे. शिवाय निवडून आलेल्या उमेदवारांनी केलेला खर्च, परिश्रम त्यांची काही चुकी नसताना वाया गेली आहे. त्यामुळे त्यावरही सर्वोच्च न्यायालयात विचार होऊ शकतो.

दरम्यान, पुन्हा निवडणूक झाल्यास जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता जाते की राहते हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या गटातील प्रत्येकी दोन गणांतही निवडणूक होईल का हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. अन्यथा पंचायत समिती सदस्यांनाही सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. भाजपचे सद्यःस्थितीत ३९ सदस्य आहेत. त्यांपैकी १५ सदस्य गेले तरी त्यांच्याकडे २४ सदस्य उरतात. याचाच अर्थ १५ पैकी फक्त पाच जागा त्यांना निवडून आणायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात काय होते, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.


इतर बातम्या
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...
हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास...सांगली ः कर्नाटक आणि इतर राज्यांतून येणारा आंबा...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
कांदा बियाण्यांत फसवणूक; कृषी विभाग...नगर ः रब्बीत कांदा लागवड करण्यासाठी यंदा गावराण...
नगर, नाशिकमध्ये दीड कोटी टन उसाचे गाळपनगर : नगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६ साखर...
साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे...सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस...
पुणे जिल्हा बँकेत ११०० कोटींवर ठेवी;...पुणे : देशातील अग्रगण्य पुणे जिल्हा मध्यवर्ती...
सातारा जिल्ह्यात रब्बीत १४४ टक्के कर्ज...सातारा : रब्बी हंगाम सर्वच बँकांनी पीककर्ज वितरण...
डाळिंब पिकाचे २१पासून ऑनलाइन प्रशिक्षणऔरंगाबाद : येथील कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड व...
बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमीनगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात...
सोलापूर जिल्ह्यात 'पूर्वमोसमी'चा २३००...सोलापूर : जिल्ह्यात चार- पाच दिवस झालेल्या...
सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रकल्प...औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील आडगाव (भोंबे) येथील...
पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने...अकोलाः दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण...
अकोला ‘झेडपी’च्या जमिनीला मिळाला २२...अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली शेती ११...