सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले

सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले
सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे कल स्पष्ट झाले आहेत.  त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख (दोन्ही भाजप) या भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी आपआपले गड राखले आहेत. तर  आमदार दिलीप सोपल (शिवसेना), यशवंत माने (राष्ट्रवादी), सचिन कल्याणशेट्टी (भाजप) यांनीही चुरशीच्या लढतीत आघाडी कायम राखली आहे.  - दक्षिण सोलापूरमधून सहकारमंत्री देशमुख २३ हजार मताच्या फरकाने आघाडीवर राहिले आहेत. तर पालकमंत्री देशमुख यांनी ७३ हजाराचे मताधिक्य घेत आघाडी मिळवली.  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मात्र फारच झुंजावे लागले.  शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती.  आणखी दोन फेऱ्या बाकी आहेत  १० फेऱ्यापर्यंत पिछाडीवर असलेल्या प्रणिती यांनी आता सुमारे सात हजारांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर करमाळ्यात शिवसेनेने डावलेले उमेदवार नारायण पाटील यांनी आघाडी कायम राखली आहे.  माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी ऐनवेळी भाजपला बगल देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. पण इथे भाजपचे राम सातपुते आघाडीवार आहेत. सांगोल्यात ज्येष्ठ आमदार गणतपराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला अन्‌ नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. मात्र, त्याठिकाणी माजी आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील दोन हजारांपर्यंत आघाडीवर आहेत. माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. बार्शीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेने दाखल झालेले दिलीप सोपल आघाडीवर आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघात नागनाथ क्षीरसागर हे पिछाडीवर असून यशवंत माने यांनी आघाडी कायम राखली आहे. पंढरपूर- मंगळवेढ्यात भारत भालके हेदेखील आघाडीवर आहेत.अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार सिध्दराम म्हेत्रे पिछाडीवर असून सचिन कल्याणशेट्टी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com