भाजप-मनसे एकत्र येण्याची शक्यता नाही ः फडणवीस

BJP-MNS unlikely to unite: Fadnavis
BJP-MNS unlikely to unite: Fadnavis

मुंबई : भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारसरणीचा मेळ बसत नाही. त्यामुळे तूर्तास दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ९) नजीकच्या काळात भाजप-मनसे एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र, मनसेने व्यापक विचार केला आणि आपली कार्यशैली बदलली तर त्याचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणवीस यांना आपल्याच नागपूर जिल्ह्यातील सत्ता गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची गुरुवारी चिंतन बैठक पार पडली. 

बैठकीत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीला रोखण्यासाठी वेगळी रणनीती आखण्याबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीच्या चर्चेबाबत बोलताना टाळले. मात्र, हे दोन्ही पक्ष सध्या तरी एकत्र येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यपद्धतीत फरक आहे. आमचा पक्ष व्यापक असून तो सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे. त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीचा मेळ बसत नाही. त्यामुळे मनसेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून व्यापक विचार केल्यास भविष्यात याबद्दल विचार होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, नागपूरमध्ये मोठा पराभव झाला असे आम्ही मानत नाही. कारण जिल्हा परिषदेत गेल्यावेळेपेक्षा आमच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. तर सहा जिल्हा परिषदेत आमच्या १०३ जागा निवडून आल्याने भाजप मोठा पक्ष ठरल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com