सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी

शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेल्या सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविली आहे. भाजपने ऐनवेळी चाल करून शिवसेनेला शह दिल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
BJP nominates Subhash Sabne
BJP nominates Subhash Sabne

नांदेड : शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेल्या सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविली आहे. भाजपने ऐनवेळी चाल करून शिवसेनेला शह दिल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेकडून मुखेड तसेच देगलूर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेले सुभाष साबणे यांनी पोटनिवडणूक होत असलेल्या देगलूरसाठी शिवसेनेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु आघाडीमध्ये काँग्रेसकडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. यामुळे शिवसेनेने त्यांना थांबण्यास सांगितले होते. परंतु साबणे यांनी भाजपच्या माध्यमातून शिवसेनेला शह देत उमेदवारी मिळवली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा रविवारी केली यात देगलूरमधून सुभाष पिराजी साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे यांच्या उमेदवारीमुळे देगलूर मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com