गुजरातला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न ः जेटली

गुजरातला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न ः जेटली
गुजरातला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न ः जेटली

सूरत, गुजरात  ः गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अाता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उतरले अाहेत. सुरत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुजरातची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले अाहे. अाम्ही नेहमीच गुजरातला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे.

या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत केंद्रात भाजप सरकारच्या अगोदरचे सरकार नेतृत्वहीन होते. तेव्हा म्हणत होते, की ‘पंतप्रधान अाॅफिसमध्ये अाहेत; मात्र सत्तेत नाहीत’, असा टोला श्री. जेटली यांनी मारला अाहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवाकरावरून (जीएसटी) भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी सुरू अाहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीबाबत राहुल गांधी यांच्या कल्पना आणि विचार अगदी मुर्खासारखे आहेत, असे म्हटले आहे.

श्री. जेटली यांनी ट्विट करून सांगितले, की ‘२०१९ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जीएसटीचा कमाल दर १८ टक्के करू, असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये असताना दिले; मात्र हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण चप्पल आणि बीएमडब्ल्यूवर एक सारखाच कर लावता येणे शक्य आहे का?’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com