Agriculture news in Marathi BJP protests with black ribbons on November 1 | Page 2 ||| Agrowon

भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती लावून निषेध

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

भाजप कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध करणार आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. २१) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची दानत नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे. मदतीविना शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागणार. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध करणार आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. २१) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भातील संपूर्ण पिके नष्ट झाली. जमिनी खरडून गेल्या. सोयाबीनचे ८२ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीत खरे तर पंचनामे करायचे गरज नाही. दोन वादळांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परंतु दिवाळी तोंडावर आली तरी अद्याप सरकार शेतकऱ्यांना मदत द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव मदत केली होती. विमा भरपाईसुद्धा दिली होती. 

वेगवेगळ्या भागात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारने जाहीर केलेले १० हजार कोटींचे पॅकेज तोकडे आहे. विमा भरपाईची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केला असता, तर या इंधनाच्या किमती कमी राहिल्या असत्या, असेही पाटील म्हणाले. या वेळी आमदार मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे, डॉ. सुभाष कदम उपस्थित होते.


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...