agriculture news in marathi, bjp refuse candidacy for senior leaders, mumbai, maharashtra | Agrowon

भाजपने दिग्गजांना तिकीट नाकारले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या जाहीर करत भाजपने १५० उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने आत्तापर्यंत १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट नाकारलेल्यांमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या जाहीर करत भाजपने १५० उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने आत्तापर्यंत १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट नाकारलेल्यांमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उभे राहता यावे, यासाठी मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आले. संगीता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळाले आहे. विशेष म्हणजे नंदुरबारमधील शहाद्याचे विद्यमान आमदार उदेसिंह पाडवी यांचे तिकीट कापून त्यांच्याच मुलाला संधी देण्यात आली आहे. परंतु, पाडवी यांना मुलाला तिकीट दिल्याचाही राग आला आहे. जळगावातील चाळीसगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना आपल्या पत्नीला तिकीट मिळावे अशी आशा होती, मात्र ती मावळल्याने पाटीलही नाराज आहेत.

 दरम्यान, विक्रमगडचे आमदार विष्णू सावरा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या जागी पुत्र हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आले आहे. तर कसबा पेठचे आमदार गिरीश बापट खासदारपदी निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे.

‘पक्षश्रेष्ठींना विचारेल, मला तिकीट का नाही?’

तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पक्ष जो काय आहे तो विचार करेल. निवडणुकीच्या काळात कोण चूक कोण बरोबर याचा विचार करण्याची ही वेळ नाही, असे विनोद तावडे म्हणाले. मी कार्यकर्ता आहे, तळागाळातल्या माणसांसाठी काम करायचे आहे. तिकीट का नाही मिळाले याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींशी जरूर करेन. माझे काही चुकले असेल तर त्याची माहिती घेऊन दुरुस्त करेन, असेही तावडेंनी सांगितले.
 

विद्यमान आमदार नवीन संधी मतदारसंघ
विनोद तावडे सुनील राणे बोरीवली, मुंबई
प्रकाश मेहता पराग शहा घाटकोपर पूर्व, मुंबई
राज पुरोहित  राहुल नार्वेकर कुलाबा, मुंबई
एकनाथ खडसे रोहिणी खडसे  मुक्ताईनगर, जळगाव
सरदार तारासिंह मिहीर कोटेचा   मुलुंड, मुंबई
विजय काळे सिद्धार्थ शिरोळे  शिवाजीनगर, पुणे
मेधा कुलकर्णी  चंद्रकांत पाटील कोथरूड, पुणे
बाळा काशिवार परिणय फुके साकोली, भंडारा
उदेसिंह पाडवी राजेश पडवी शहादा, नंदुरबार
उन्मेष पाटील मंगेश चव्हाण  चाळीसगाव, जळगाव
प्रभूदास भिलावेकर  रमेश मावस्कर मेळघाट, अमरावती
चरण वाघमारे प्रदीप पडोळे  तुमसर, भंडारा
बाळासाहेब सानप  राहुल ढिकळे नाशिक पूर्व, नाशिक
सुधाकर कोठले    मोहन माटे  नागपूर दक्षिण
आर. टी. देशमुख रमेश आडासकर माजलगाव, बीड
संगिता ठोंबरे   नमिता मुंदडा  केज, बीड
सुधाकर भालेराव  अनिल कांबळे उदगीर, लातूर
राजू तोडसाम संदीप धुर्वे आर्णी, यवतमाळ
विष्णू सावरा हेमंत सावरा विक्रमगड, पालघर

 


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...