Agriculture news in Marathi, BJP-Shiv Sena's finger on each other after the coalition government does not come | Agrowon

युतीचे सरकार न येण्यामागे भाजप-शिवसेनेचे एकमेकांकडे बोट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या पंधरा दिवसांनंतर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शुक्रवारी (ता.८) आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असून, त्यामुळे राज्यात नवे सरकार येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकणार आहेत. 

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या पंधरा दिवसांनंतर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शुक्रवारी (ता.८) आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असून, त्यामुळे राज्यात नवे सरकार येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकणार आहेत. 

राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी युतीचे सरकार न येण्याचे खापर शिवसेनेवर फोडले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप केला, भाजपचे ते वक्तव्य खूप क्लेशदायक होते, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. दोन्ही पक्षात पद आणि सत्तेचे समसमान वाटप असे ठरले होते. शहांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता, असा दावाही त्यांनी केला. 

श्री.फडणवीस यांनी राज्यात महायुतीचे सरकार न येण्याचे खापर शिवसेनेवर फोडले. निकालादिवशी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपल्यापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते. तेव्हाच आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. तरीही भाजपने सेनेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या फोनलाही उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही. भाजपशी चर्चेचे दरवाजे बंद करत सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मात्र चर्चा सुरू ठेवली होती, असा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी केला. तसेच शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपने कोणताही शब्द दिला नव्हता, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीला आम्ही युतीने सामोरे गेलो होतो, त्यामुळे राज्यात युतीचेच सरकार स्थापन व्हावे, अशी आमची भूमिका होती, असेही त्यांनी म्हटले आहे. जे गैरसमज झाले होते ते चर्चेतून सुटले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप 
अत्यंत क्लेशदायक ः उद्धव ठाकरे 

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे ते वक्तव्य अत्यंत क्लेशदायक होते. वेळ मारून नेण्यासाठी मी खोटं बोलणार नाही. लोकसभेपूर्वी भाजप-शिवसेनेत झालेल्या बैठकीचे सर्व तपशील त्यांनी सर्वांपुढे मांडले. दोन्ही पक्षात पद आणि सत्तेचे समसमान वाटप असे ठरले होते. शहांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तेचे वाटप अशी बोलणी झाली होती. पद या शब्दात मुख्यमंत्रीपद हे आलेच. गोड बोलून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. 
 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...