भाजपने बॅलेट पेपरवर विजय मिळवावा ः चव्हाण

भाजपने बॅलेट पेपरवर विजय मिळवावा ः चव्हाण
भाजपने बॅलेट पेपरवर विजय मिळवावा ः चव्हाण

म्हसवड, जि. सातारा : इव्हीएम मशिनच्या जिवावर सत्ता आणणाऱ्या भाजपने बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) निवडणुकांना सामोरे जाऊन विजय मिळवून दाखवावा. परंतु, ते त्यांना शक्‍य नसल्यानेच त्याची भीती वाटणारा भारतीय जनता पक्ष म्हणजे घोषणांचा बाजार आहे. सामाजिक, आर्थिक, कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर भाजप अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे सामान्य जनतेत असंतोष आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच जनसंघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

कॉंग्रसेची जनसंघर्ष यात्रा म्हसवड येथे सोमवारी सायंकाळी आली. त्यानंतर येथील बाजार पटांगणात जाहीर सभा झाली. त्यात श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, शरद रणपिसे, अमरजित काळे, विश्वजित कदम, माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंडगे, ॲड. भास्करराव गुंडगे, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, सोनिया गोरे आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘भाजप पत्र हा देशास कॅन्सर रोगाप्रमाणे चिटकून राहिला आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी त्याचे मुळासकट उच्चाटन करावे लागणार आहे.’

श्री. विखे-पाटील म्हणाले, ‘विकासाचा ठेका आपण घेतल्याचा आव आणून दिशाभूल करणारी माहिती देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्वप्नरंजन करणारे भाजप सरकार सामान्यांना मारकच आहे. सनातनी विचारांना लादणाऱ्या भाजप सरकारला आता वेळीच थांबवण्याची गरज आहे. त्यांना सरकार चालवण्यात अपयश आले आहे.  यावेळी पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, विश्वजित कदम यांची भाषणे झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com