Agriculture news in Marathi BJP sits today for kharif crop loan | Agrowon

खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

सोमवार (ता. १०) पासून प्रत्येक बँकेत जात भाजप कार्यकर्ते शेतकऱ्यांना साहाय्यक म्हणून मदत करतील तसेच बँकेमध्ये ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.

अमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा पीक कर्जासाठी टाळाटाळ होत आहे. या विरोधात सोमवार (ता. १०) पासून प्रत्येक बँकेत जात भाजप कार्यकर्ते शेतकऱ्यांना साहाय्यक म्हणून मदत करतील तसेच बँकेमध्ये ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.

खरीप हंगामासाठीचे कर्ज जुलै पर्यंत मिळणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, कर्ज माफीसाठी कोणत्याच प्रकारचे नियोजन न करण्यात आल्याने शेतकऱ्यांना हंगाम अर्ध्यावर आला असताना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. आता कर्जमाफीच्या याद्यांची तपासणी झाल्यावर सुद्धा शेतकरी बँकेत गेल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  कर्जमाफी झालेल्यांना, जुने कर्ज असलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पीक कर्जा करता फक्त सातबारा, आठ-अ, आधार कार्ड एवढ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. बँका मात्र शेत नकाशा, दहा-अकरा बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र, फेरफार अशी अनावश्यक कागदपत्रे मागत आहेत. त्यामुळे शेत नकाशासाठी भूमिअभिलेख कार्यालयात गर्दी उसळली आहे. फेरफारसाठी तलाठ्याकडे जावे लागत आहे. बँका कर्जमाफी झालेल्या दिनांकानंतरचे व्याज भरण्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांना बाध्य करीत आहेत. बँकांना व्याज न घेण्याचे निर्देश सहकार मंत्र्यांनी दिले होते. बँका त्यांचे पण आदेश जुमानत नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. अमरावती विभागात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २२०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप अपेक्षित असताना अवघे १३५१ कोटी कर्ज वाटप झाले आहे. अमरावती जिल्हा बँकेने फक्त ३३ टक्के रकमेचे वाटप केले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांना पाच हजार ९७४ कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी फक्त १८३४ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. विभागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्ज वाटपाची टक्‍केवारी अवघी ३० आहे. अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ २३ टक्‍के कर्जवाटप केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...