आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारीस असतात : भाजप प्रवक्ते अवधूत वाघ

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारीस असतात : भाजप प्रवक्ते अवधूत वाघ
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारीस असतात : भाजप प्रवक्ते अवधूत वाघ

मुंबई : भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचा जावईशोध लावला होता. काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्वीट करत वाघ यांनी मोदींना थेट देव करुन टाकले होते आणि आता पुन्हा एकदा अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं ही लावरीस असतात असं ट्विट केले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

नेटिझन्सनी केले ट्रोल अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेंले ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मुळे नेटिझन्सनीं टिकेची झोड उठवत त्यांना चांगले ट्रोल केले आहे. 

भाजप कारवाई करणार का ? महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद काढून घेतले होते. अवधूत वाघ यांनी ट्विट करत थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचयकुटुंबाच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र राम कदमांवर जशी भाजपने कारवाई करत गप्प बसवले तसे अवधूत वाघ यांच्यावर भाजप नेमकी काय कारवाई करेल हेच पहावं लागणार आहे. हेच ते वादग्रस्त ट्वीट...

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा... हागणारा नाही तर बघणारा लाजातो https://t.co/XHOP9TIp9A

— चौकीदार Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) March 28, 2019

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com