agriculture news in Marathi bjp will agitation if farmers problem would not solve Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन करेल 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच वेगवेगळ्या विषयांवर त्रास होता कामा नये. यासाठी शेतकऱ्याला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची दखल महसूल विभागाने घ्यावी.

अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच वेगवेगळ्या विषयांवर त्रास होता कामा नये. यासाठी शेतकऱ्याला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची दखल महसूल विभागाने घ्यावी. शेतकऱ्यांना त्रास झाला तर भाजप सहा जूननंतर आंदोलन पुकारेल, असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. 

अकोला तहसील कार्यालयात भाजप व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तहसीलदारांसोबत चर्चा केली. मॉन्सूनचे आगमन होऊन खरीप पिकाची पेरणी होणार आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, पीक कर्ज, ७/१२, हक्क नोंदणी, फेरफार व शेतकऱ्यांना लागणारे सर्व कागदपत्रांसाठी सहकार्य करून शेतकऱ्यांना कोरोना विषाणूच्या सावटात सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये.

अकोला तालुक्यात १५०० शेतकऱ्यांच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे का जमा झाले नाही, असा प्रश्न करून ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा व्हावी व शेतकऱ्याला सर्व परीने मदत करण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज करावी अशा सूचना तहसीलदार विजय लोखंडे व महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्यात. 

यावेळी अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे, राजेश बेले, देवेंद्र देवर, चंद्रशेखर खडसे, मंगेश सावरकर, भरत काळमेघ, रणजीत खेडकर, ज्ञानेश्वर कडू आदींची उपस्थिती होती. 
 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...