केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता येईल : दानवे

केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता येईल : दानवे
केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता येईल : दानवे

अकोला : देशात भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र होत आ​हेत. परंतु त्याची चिंता नाही. गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांचा अजेंडा घेऊन जनतेपर्यंत जाऊ. पुन्हा भाजपचे सरकार केंद्र व राज्यात येईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 

अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर आदी उपस्थित होते. 

राज्यात शिवसेनेकडून वारंवार आव्हान दिले जात असल्याबद्दल छेडले असता दानवे म्हणाले, आम्ही हतबल नाही. मत विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत ठेवण्याचे धोरण आहे. शेवटपर्यंत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहील. 

भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. पंतप्रधानांनी पीकविमा योजनेचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना हमखास फायदा होत आहे. राज्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे जलक्रांती होत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटल्या नाहीत. तरीही सरकारने शेतीत गुंतवणूकवाढीच्या दृष्टीने काम केले. त्याचे परिणाम आगामी काळात दिसू लागतील. शेतीमालाला भाव देण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असेही दानवे म्हणाले.

त्यांच्याजवळ मुद्दाच नाही काँग्रेस राफेल मुद्द्यावर जिल्हा, तालुका पातळीपर्यंत भाजपविरुद्ध आदोलन करीत असल्याबद्दल दानवे यांना विचारले. ते म्हणाले, राफेल हा वादाचा मुद्दाच नसल्याने स्पष्ट झाले आहे. तरीही काँग्रेस याबाबत आंदोलने करीत आहे. त्यात काहीही दम नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com