agriculture news in marathi, black gram productivity decrease due to rain, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७० टक्क्यांनी कमी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्केच उडदाचे उत्पादन आले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगानंतर ही स्थिती स्पष्ट झाली आहे. उडदाचे उत्पादन कमी झाल्याने यंदाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्केच उडदाचे उत्पादन आले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगानंतर ही स्थिती स्पष्ट झाली आहे. उडदाचे उत्पादन कमी झाल्याने यंदाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

जिल्ह्यातील पारनेर, नगर, शेवगाव, जामखेड भागांत उडदाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरवातीला जर चांगला पाऊस झाला तर उडदाची पेरणी अधिक प्रामाणात होते. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागले असले तरी, पावसाळ्याच्या सुरवातीला मात्र चांगला पाऊस झाला. शिवाय नंतरही कमी-जास्त प्रामाणात पाऊस झाल्याने उडदाचे पीक चांगले आले. यंदा मात्र सुरवातीलाही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे उडदाच्या पेरणीवर आणि त्यानंतर उगवणीवर परिणाम झाला. तसेच पावसाचा मध्यंतरीच्या काळात खंड पडल्याने उडदाच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे कृषी विभागाने काढलेल्या उत्पादकतेवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता ५१८ किलो ८२४ ग्रॅम होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७० टक्के घट झाली असून, यंदा हेक्टरी १७१ किलो ४०० ग्रॅम एवढी उत्पादकता मिळाली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

यंदा कृषी विभागाने उडदासाठी चाळीस पीक कापणी प्रयोग केले. यंदा उडदाच्या उत्पादनात घट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. संगमनेर तालुक्यात मात्र उत्पादकता चांगली आहे. अकोले तालुक्यातही उडदाचे उत्पादन घेतले जाते, मात्र अजून अकोल्याचा अहवाल आलेला नाही. गेल्या वर्षी अकोल्यात हेक्टरी ८२० किलो उत्पादन मिळाले होते.

तालुकानिहाय हेक्टरी उत्पादकता कंसात गेल्या वर्षीची उत्पादकता  : पारनेर ः  १२२ किलो १७४ ग्रॅम (६३४ किलो ५००ग्रॅम), जामखेड ः १८३ किलो ६६७ ग्रॅम (२४२ किलो ५०० ग्रॅम), संगमनेर ः ३०५ किलो (७३४ किलो ५०० ग्रॅम).

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...