Agriculture news in Marathi The black market for onion seeds continues | Agrowon

कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

नाशिक विभागात कांदा उत्पादक पट्ट्यात चढ्या दराने विक्रीसह जुने कांदा बियाणे मिसळून विक्रीचा काळाबाजार होत असल्याचा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे बिजोत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम चालू वर्षी उपलब्धतेवर झाल्याने बियाणे टंचाई आहे. त्यामुळे नाशिक विभागात कांदा उत्पादक पट्ट्यात चढ्या दराने विक्रीसह जुने कांदा बियाणे मिसळून विक्रीचा काळाबाजार होत असल्याचा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सध्या कांदा बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू आहे. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था व नामवंत कंपन्या यांच्याकडे मर्यादित बियाण्यांचा साठा संपलेला आहे. काही विक्रेत्यांनी साठेबाजी करून किमतीपेक्षा अधिक दराने विक्री सुरू आहे. तर, काही जण अधिकृत विक्रेते नसताना बियाणे उपलब्ध असल्याचा दावा करून खुली विक्री करत आहेत. तर काही अधिकृत विक्रेते साठेबाजी करून चढ्या विक्री किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करत आहेत. कांदा बनावट बियाण्यांची टोळी सक्रीय झाल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

खुल्या पद्धतीने विक्री
काही शेतकरी शास्त्रीयदृष्ट्या बिजोत्पादन घेतात. त्याचे बियाणे शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून खातरजमा करून सत्यप्रत म्हणून विकलेही जाते. मात्र काही विक्रेते जालना, औरंगाबाद जिल्ह्यातून विक्री करण्यासाठी आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

बियाणे टंचाई असल्याने शेतकऱ्यांकडून खात्री करून बियाणे खरेदी करावी. जर कंपनीचे असेल तर पक्के बिल घेऊन ते आपल्याकडे जपून ठेवावी. बनावट असल्याचा संशय आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.
- संजीव पडवळ, विभागीय सहसंचालक, कृषी विभाग, नाशिक

चालू वर्षी काही विक्रेत्यांनी खुले बियाणे विक्री केली. त्याची पावती न दिल्याचा प्रकार आहे. काही विक्रेते नोंदणीकृत असून मग खुले बियाणे कसे विकतात. खात्री का देत नाहीत. यासाठी कृषी विभागाने बनावट विक्रेते शोधण्याची मोहीम हाती घ्यावी.
- भारत दिघोळे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

कांदा पीक हवामानाला संवेदनशील आहे. त्यामुळे सध्या तुटवडा असल्याने बियाणे खरेदी करताना पक्की बिले घेऊन सतर्कता बाळगावी. काही नवे, जुने एकत्र करून विक्रीचा प्रकार होऊ शकतो. बनावट लेबल लावून बियाणे विक्री होत असल्याचे घडू शकते. शक्यतो उगवणक्षमता तपासावी. असे प्रकार टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन करावे.
- डॉ. सतिश भोंडे, अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...