agriculture news in marathi Black pepper harvesting technology | Agrowon

काळी मिरी काढणी तंत्रज्ञान

डॉ. सुमित राऊत, संतोष पाटील, विवेक गिर
शुक्रवार, 20 मार्च 2020

विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला जातो. मिरीला युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लागवडीच्या तीन वर्षांनंतर मिरीचे उत्पादन सुरू होते. मिरीला मे ते जून महिन्यामध्ये तुरे येतात व जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढणीसाठी तयार होतात.

काढणी 

विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला जातो. मिरीला युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लागवडीच्या तीन वर्षांनंतर मिरीचे उत्पादन सुरू होते. मिरीला मे ते जून महिन्यामध्ये तुरे येतात व जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढणीसाठी तयार होतात.

काढणी 

 • घोसामधील एक ते दोन मणी पिवळे किंवा नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलावरील सर्व घोस काढावेत. काढलेल्या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करावेत.
 • दाण्यांवर उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून उन्हामध्ये वाळवावेत. सुमारे सात ते दहा दिवस दाणे उन्हात वाळवावे लागतात.
 • काळीमिरी तयार करण्यासाठी मिरी दाणे वाळवण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवून ठेवावे.
 • यामुळे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येऊन त्यांची प्रत सुधारते. तसेच साठवणीच्या वेळी बुरशीमुळे होणारे नुकसान टाळले जाते.

हिरवी मिरी

 • हिरवी मिरी तयार करण्यासाठी घड पूर्ण तयार होण्यापूर्वी काढावेत. हिरवी मिरीची साठवण करण्यासाठी १५ ते २० टक्के मिठाच्या द्रावणात ठेवावी. नंतर डबा अथवा बाटलीमध्ये सीलबंद करावे.

काळी मिरी तयार करणे

 • घडातील एक, दोन फळे तांबडी लाल होताच संपूर्ण घड काढणी करावी. 
 • गर्द काळा रंग येण्यासाठी मिरी फळांना गरम पाण्याची प्रक्रिया दिली जाते.
 • देठविरहित फळे बांबूच्या करंडीत, टोपलीत किंवा कापडी पिशवीत भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावीत. नंतर उन्हामध्ये वाळवावी.

पांढरी मिरी तयार करणे

 • या पद्धतीत पूर्ण पक्व झालेले (लाल/नारंगी रंगाचे) दाणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे उकळवले किंवा वाफवले जातात. नंतर पल्पिंग मशिनद्वारे त्यांच्यावरील साल काढली जाते. साल काढल्यानंतर दाणे ब्लिचिंग पावडरच्या द्रावणात घालावेत व नंतर वाळवावेत.
 • दाण्यांच्या उरलेल्या सालीपासून तेल काढले जाते. त्यामुळे साल वाया जात नाही.
 • मिरीच्या घडामधील जास्तीत जास्त फळे पिवळसर लाल झाल्यावर घड काढणी करावी. फळे घडापासून वेगळी केल्यावर गोणपाटामध्ये भरावीत.
 • फळे वाहत्या पाण्यामध्ये ७ ते १० दिवस बुडवून ठेवावी. त्यामुळे फळावरील साल मऊ होते. हाताने किंवा फडक्यामध्ये फळे चोळून त्यावरील साल काढवी.
 • बिया पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन ३ ते ४ दिवस उन्हामध्ये वाळवाव्या. तयार झालेली पांढरी मिरी स्वच्छ सुक्या कपडामध्ये चोळावी. त्यामुळे मिरी चकचकीत पॉलिश केल्यासारखी दिसते.

उत्पन्न

 • एका मिरीच्या वेलापासून सुमारे २ ते ३ किलो वाळलेली मिरी मिळते. लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होऊन हळूहळू वाढते.
 • शंभर किलो हिरव्या मिरीपासून सुमारे ३३ किलो काळी मिरी मिळते.

संपर्क - डॉ. सुमित राऊत, ९९२२७७६७७४
(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)


इतर मसाला पिके
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
हळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....
हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...