agriculture news in Marathi black selling of urea in dahanu taluka Maharashtra | Agrowon

डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा काळाबाजार?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार काळाबाजार सुरु असून याकडे पालघर जिल्हा कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार काळाबाजार सुरु असून याकडे पालघर जिल्हा कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. युरिया माफियांचे मुख्य केंद्र वाणगाव येथील वाड्या असल्याचे समोर आले आहे.

खते विक्रेते व्यापारी, कृषी सेवा केंद्राचे मोठे व्यापारी संगनमताने युरियाचा काळाबाजार करीत असून बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना लाखो टन अनुदानित युरिया विकला जात असल्याचे बोलले जाते. याला स्थानिक राजकीय अभय मिळत असल्याची चर्चा आहे.

वाणगाव, डहाणू, वाडा व इतर ठिकाणच्या मोठ्या कृषी केंद्रांच्या व्यापाऱ्यांकडून हा युरिया चारोटी, डहाणू मार्गे वाणगाव, दाभले, साखरे, बाडापोखरण येथे अनुदानित युरियाची सरकारी गोणी बदलून तो युरिया दुसऱ्या गोणीमध्ये भरुन खोट्या दस्ताऐवजच्या साह्याने  वाणगाव, पाचमार्ग, बोईसरमार्गे कारखान्यांना पुरवला जातो. खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी कृषी विभागात प्राप्त झाल्या होत्या. 

बोईसरमधील औद्योगिक कारखान्यांना काळ्या बाजारात बाराशे रुपये पेक्षा जास्त किमतीला हा अनुदानित युरियाची विक्री केली जाते. पालघर जिल्ह्यामध्ये अनुदानित युरिया घोटाळ्याकडे लक्ष वेधून सुद्धा पालघर कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करुन कठोर कारवाई करत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा या अवैध धंद्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया
युरियाच्या काळ्या बाजाराबाबत कृषी विभागामध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेऊन संबंधित अवैध युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. जर साठा शिल्लक असेल आणि कृषी केंद्रे शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करत नसतील तर त्यांनी तत्काळ कृषी अधीक्षक पालघर अथवा तालुका कृषी कार्यालयात तक्रार द्यावी. अशा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल.
- के.बी. तरकसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...