agriculture news in Marathi black spot on Hapus Mango Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हापूस आंब्यावर काळे डाग 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

 जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम दिसू लागला आहे.

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम दिसू लागला आहे. आंब्यावर काळे डाग पडत असल्यामुळे आंबा नुकसानीच्या शक्यतेने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात ४ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. या कालावधीत सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहीले. अपवादात्मक सुर्यप्रकाश होता. याचा मोठा फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हापूस आंब्याला बसताना दिसत आहे. जिल्ह्यात देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये आंब्याला मोहोर आणि फळे देखील आहेत तर इतर तालुक्यात फक्त पालवी आणि मोहोर दिसत आहे. 

मोहोर आणि फळे अशा स्थितीत असलेल्या बागांना अवकाळीचा मोठा दणका बसला. देवगड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये आंबा तयार होण्याच्या स्थिती होता. या आंब्याचे मोठे नुकसान पावसाने झाले आहे. सध्या फळांवर काळे डाग पडलेले दिसून येत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या झाडांवरील मोहोर गळून पडल्याचे चित्र आहे. अवकाळीमुळे आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहीले असून नुकसान होण्याच्या शक्यतेने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, पाच ते सहा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आता निवळताना दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलेला नाही. तर सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील वातावरण निवळले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या घेता येणार आहेत. 

प्रतिक्रिया
आंबा फळांवर काळे डाग येण्याची विविध कारणे आहेत. तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात, त्यामुळे फळांवर काळे डाग पडतात. तांबड्या कोळ्यांमूळे फळांचा प्रादुर्भित भाग करडा होतो. फुलकिडीमुळे फळांची साल खडबडीत होऊन फळावर विटकरी रंगाचे डाग दिसतात. आंबेगुच्छ मध्ये असल्यास अशा ठिकाणी आंबा फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे प्रादुर्भाव झालेला भाग काळा होतो. मोठी आंबा फळे मोहराला अथवा मोहराच्या मिशाना घासत राहिल्यास तेथे डाग पडतात. त्यामुळे बागायतदारांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. 
- डॉ. विजय दामोधर, प्रभारी अधिकारी, आंबा संशोधन उपकेंद्र, रामरेश्वर, देवगड, जि. सिंधुदुर्ग 


इतर अॅग्रो विशेष
उत्पादन, दर्जावाढीसाठी आंबा पुनरुज्जीवन...चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो...
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र...भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता....
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही ः ...मुंबई ः हवे तर सरकारने चार-पाच हजार कोटी रुपयांचे...
कृषी संचालक ‘कॅबिन’ बाहेर पडले पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयात बसलेल्या...
ऊन वाढण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी...
कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू...
नवती केळीचे दर १३५० रुपये प्रतिक्विंटल जळगाव ः खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५०...
बाजारबंद, वेळांच्या निर्बंधांचा ...अकोला ः कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या...
द्राक्ष व्यापारी नोंदणीला यंदाही...सांगली ः हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी निधी देणार : दादा भुसेमुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता...
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग...रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने...
पाण्याच्या अंदाजपत्रकात पशुधनाचा विचार...भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी...
कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम...कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात...
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना...सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३०...
कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना...नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी...
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढलेअकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने...
‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन...नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान...
शेतमाल बाजारपेठेसाठी सरकारचे विशेष...मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामध्ये पीक,...
गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी...