agriculture news in Marathi black what production in Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात पिकणार काळा गहू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 जिल्ह्यात विविध पिकांबरोबर आता काळा गहू पिकणार आहे. महाबळेश्वरसह विविध तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण उपक्रमातून काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. 

सातारा ः जिल्ह्यात विविध पिकांबरोबर आता काळा गहू पिकणार आहे. महाबळेश्वरसह विविध तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण उपक्रमातून काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. यामुळे पुढील काळात काळ्या गव्हाची चव चाखता येणार आहे. 

सातारा जिल्ह्यात प्रथमच क्षेत्र महाबळेश्वरसह जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण असा काळा गहू पिकवला जाणार आहे. नुकतेच महाबळेश्वर येथील प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते काळ्या गव्हाची म्हणजे ‘एनबीएमजी’ या वाणाची नुकतीच पेरणी करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते. 

कृषी सहायक दीपक बोर्डे यांनी काळ्या गव्हाचे बियाणे महाबळेश्वर, तसेच सातारा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुण दिले आहे. कृषी सहायक बोर्डे हे नेहमीच शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीविषयी प्रेरित करतात. नुकतेच त्यांनी काश्मिरी केशरची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून महाबळेश्वरला काळ्या गव्हाची लागवड होत आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यामध्ये पूर्वीपासून गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; परंतु वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे गव्हाखालील क्षेत्र कमी होत गेले. या नवीन गव्हाच्या वाणामुळे महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांना नवीन पौष्टिक अशा काळ्या गव्हाच्या चपातीचा, पोळीचा आस्वाद घेता येणार आहे. या नवीन वाणाची महाबळेश्वरसह इतर तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. 

काळ्या गव्हाच्या वाणाचे संशोधन मोहाली येथील ‘एनएबीआय' या संशोधन केंद्रातील मोनिका गर्गे यांनी केले आहे. मोहाली परिसरातील शेतकऱ्यांकडून हा वाण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पौष्टिक गव्हाची मागणी वाढून जास्तीतजास्त शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे वळतील व शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न यामधून मिळेल, असे कृषी सहायक श्री. बोर्डे यांनी सांगितले.

ताण- तणाव, मधुमेह, लठ्ठपणासाठी गुणकारी 
काळा गहू हा अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आदी अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येते, तसेच भरपूर प्रमाणात अँटी ऑक्‍सिडन्ट, अँथोसायनिन घटक या काळ्या गव्हात असल्यामुळे ताण तणाव, मधुमेह, लठ्ठपणा, इतर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...