agriculture news in marathi blackmailing of dipping oil need for Raisin | Agrowon

‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच

मुकुंद पिंगळे/ संतोष सिरसट
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या ‘डिपिंग ऑईल’ची अनधिकृत विक्रेत्यांकडून बोगस बिले देऊन चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या ‘डिपिंग ऑईल’ची अनधिकृत विक्रेत्यांकडून बोगस बिले देऊन चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

कृषी विभागाने अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक केली असली, तरी बाजारात तुटवडा असताना अनधिकृत विक्रेते माल कुठून उपलब्ध करतात, अन् चढ्या दराने बोगस बिले देऊन विक्री कशी होते? असा सवाल उपस्थित होत आहे.

बेदाणानिर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांची विक्रेत्यांकडेही मागणी वाढल्याने साठ्यावर मर्यादा आल्या आहेत. कृषी विभागाच्या पुढाकारातून काही प्रमाणावर रसायने उपलब्ध झाली असली, तरी काही विक्रेत्यांकडे अधिकृत परवाने नसताना चढ्या दराने डिपिंग ऑईलची विक्री सुरू असल्याची माहिती आहे. काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाने मर्यादित विक्रेत्यांना परवाने दिल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी दिली. त्यानुसार रसायनांची विक्री करताना पक्की बिले देण्यासह दैनंदिन विक्री अहवाल सादर करणे अनिवार्य केल्याचे सांगितले. मात्र काही भागात बोगस बिले देऊन विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.  

सध्या बाजारात डिपिंग ऑईलचा तुटवडा असताना इतर विक्रेत्यांकडे साठा कुठून आला? हा प्रश्न उपस्थित होऊ आहे. रसायनांची मुबलक उपलब्धता होईपर्यंत लूट सुरू राहणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने वाढलेले दर, होणारा काळाबाजार याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

नाशिक मधील विकेत्यांनी दिलेल्या माहिती
(दर उत्पादक कंपनीनुसार प्रति लीटर दर)

  • सर्वसाधारण दर : १०० ते २०० प्रतिलीटर
  • अनधिकृत विक्री दर : १५० ते ४०० रुपये प्रतिलीटर

सोलापूरातही कृत्रिम तुटवडा
लॉकडाऊनमुळे कोंडीत सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीचा मार्ग धरला. मात्र, बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑईल व बॉक्‍सचा कृत्रिम तुटवडा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी डिपिंग ऑईलची मागणी डोंबिवली येथून करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. काळाबाजार केवळ चढ्या दराने त्याची विक्री करण्यासाठी केला जात असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यात बॉक्‍स उपलब्ध असूनही त्याचे बुकिंग करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. 

सोलापूरात ‘डिपींग ऑइल’ झाले ११ हजार रुपये 
लॉकडाऊनपूर्वी ५० लिटर डिपिंग ऑइलसाठी आठ ते साडेआठ हजार रुपयांना मिळत होते. मात्र, आज ते घेण्यासाठी ११ हजार रुपये द्यावे लागतात. त्याचबरोबर पूर्वी २४ रुपये असलेल्या बॉक्‍सचा दर आता ३२ ते ३५ रुपये इतका झाला आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...