पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्‍यांपर्यंत वाढले 

इथेनॉल वर्षाच्या पुरवठ्याच्या पहिल्या चार महिन्यांत देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्यांपर्यंत झाले आहे. २०२२ पर्यंत दहा टक्के मिश्रण करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे.
The blending of ethanol in petrol increased to 7.2 per cent
The blending of ethanol in petrol increased to 7.2 per cent

कोल्हापूर : इथेनॉल वर्षाच्या पुरवठ्याच्या पहिल्या चार महिन्यांत देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्यांपर्यंत झाले आहे. २०२२ पर्यंत दहा टक्के मिश्रण करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. 

उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये ९.५ ते १० टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण होत आहे. ही राज्ये देशाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत आहेत. देशाचा विचार केल्यास गेल्या वर्षीपर्यंत मिश्रणाचे प्रमाण ५.२ टक्के इतके होते. यंदा पहिल्यांदाच मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे. 

या वर्षापासून केंद्राने इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देत इथेनॉलच्या विक्री दरातही वाढ केली आहे. मार्चअखेर तेल कंपन्यांनी कारखानदारांकडे ४.५७ अब्ज लिटर्सची मागणी नोंदविली आहे. यापैकी २.९८ अब्ज लिटर्सचे करार केले आहेत. यापैकी १ अब्ज लिटर्सचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला आहे. बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसातून ७७० कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती झाली आहे. यामुळे २० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे. इथेनॉलचा करार डिसेंबर ते नोव्हेंबर या कालावधीचा आहे. कंपन्यांनी कारखान्यांकडून इथेनॉलची खरेदी करण्याची गती वाढविल्यास मिश्रणाचे प्रमाण ८ टक्क्‍यांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज सूत्रांचा आहे. 

इथेनॉल करारानुसार साखर कारखान्यांनी तयार इथेनॉल नजीकच्या तेलकंपनीकडे पोच करावा व त्याचे शुल्क तेल कंपन्यांनी कारखान्यांना द्यावे, असा नियम आहे. पण कंपन्या हे शुल्क देण्यास नकार देत आहेत. ऑक्‍टोबरपासून डिझेलचे दर पंचवीस टक्क्‍यांनी वाढले आहेत. याचा फटका इथेनॉल वाहतुकीला बसत आहे. भरीस भर म्हणून तेलकंपन्यांकडे पुरेशा क्षमतेची गोदामे नसल्याने अजूनही इथेनॉल पूर्ण क्षमतेने कारखान्यांकडून स्वीकारण्यास तेल कंपन्या राजी नसल्याचे चित्र आहे. 

इथेनॉल पुरवठ्याची गती संथच  इथेनॉल स्वीकारण्यास विलंब होत असल्याने टॅंकर कंपन्यांच्या दारात दोन दिवसांपासून ते पंधरा दिवसांपर्यंत तसेच राहत आहेत. याचा फटका इथेनॉलच्या पुरवठा साखळी मंदावण्यावर झाला आहे. कंपन्यांची संकलन क्षमता व इथेनॉल तयार होण्याचे प्रमाण याबाबतीत हंगामाच्या सुरुवातीलाच फारसा अभ्यास न झाल्याने ही परिस्थिती उद्‍भवल्याचे साखर उद्यागोतील तज्ज्ञांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com