Agriculture news in marathi The blending of ethanol in petrol increased to 7.2 per cent | Page 2 ||| Agrowon

पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्‍यांपर्यंत वाढले 

राजकुमार चौगुले
बुधवार, 7 एप्रिल 2021

इथेनॉल वर्षाच्या पुरवठ्याच्या पहिल्या चार महिन्यांत देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्यांपर्यंत झाले आहे. २०२२ पर्यंत दहा टक्के मिश्रण करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. 

कोल्हापूर : इथेनॉल वर्षाच्या पुरवठ्याच्या पहिल्या चार महिन्यांत देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण ७.२ टक्क्यांपर्यंत झाले आहे. २०२२ पर्यंत दहा टक्के मिश्रण करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. 

उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये ९.५ ते १० टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण होत आहे. ही राज्ये देशाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत आहेत. देशाचा विचार केल्यास गेल्या वर्षीपर्यंत मिश्रणाचे प्रमाण ५.२ टक्के इतके होते. यंदा पहिल्यांदाच मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे. 

या वर्षापासून केंद्राने इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देत इथेनॉलच्या विक्री दरातही वाढ केली आहे. मार्चअखेर तेल कंपन्यांनी कारखानदारांकडे ४.५७ अब्ज लिटर्सची मागणी नोंदविली आहे. यापैकी २.९८ अब्ज लिटर्सचे करार केले आहेत. यापैकी १ अब्ज लिटर्सचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला आहे. बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसातून ७७० कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती झाली आहे. यामुळे २० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे. इथेनॉलचा करार डिसेंबर ते नोव्हेंबर या कालावधीचा आहे. कंपन्यांनी कारखान्यांकडून इथेनॉलची खरेदी करण्याची गती वाढविल्यास मिश्रणाचे प्रमाण ८ टक्क्‍यांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज सूत्रांचा आहे. 

इथेनॉल करारानुसार साखर कारखान्यांनी तयार इथेनॉल नजीकच्या तेलकंपनीकडे पोच करावा व त्याचे शुल्क तेल कंपन्यांनी कारखान्यांना द्यावे, असा नियम आहे. पण कंपन्या हे शुल्क देण्यास नकार देत आहेत. ऑक्‍टोबरपासून डिझेलचे दर पंचवीस टक्क्‍यांनी वाढले आहेत. याचा फटका इथेनॉल वाहतुकीला बसत आहे. भरीस भर म्हणून तेलकंपन्यांकडे पुरेशा क्षमतेची गोदामे नसल्याने अजूनही इथेनॉल पूर्ण क्षमतेने कारखान्यांकडून स्वीकारण्यास तेल कंपन्या राजी नसल्याचे चित्र आहे. 

इथेनॉल पुरवठ्याची गती संथच 
इथेनॉल स्वीकारण्यास विलंब होत असल्याने टॅंकर कंपन्यांच्या दारात दोन दिवसांपासून ते पंधरा दिवसांपर्यंत तसेच राहत आहेत. याचा फटका इथेनॉलच्या पुरवठा साखळी मंदावण्यावर झाला आहे. कंपन्यांची संकलन क्षमता व इथेनॉल तयार होण्याचे प्रमाण याबाबतीत हंगामाच्या सुरुवातीलाच फारसा अभ्यास न झाल्याने ही परिस्थिती उद्‍भवल्याचे साखर उद्यागोतील तज्ज्ञांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...