agriculture news in marathi Block the way for Kisan Sabha in Kinwat | Page 2 ||| Agrowon

किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

नांदेड : किनवट येथील उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘घेरा डालो’ व ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच शेतकऱ्यांच्या राष्ट्रव्यापी ‘डेरा डालो, घेरा डालो’ या आंदोलनांतर्गत किनवट येथील उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘घेरा डालो’ व ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करीत कामगारांचे अधिकार कमी केले. तर दुसरीकडे कृषी कायदा करून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालून त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपात भाग घेत किसान सभेने तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी, पीकविमा योजनेची रास्त अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना फायदेशीर पीक योजना तयार करावी, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधार भावाने कायदेशीर संरक्षण द्यावे, कर्जमुक्ती योजना राबवावी, शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, नवीन वीज बिल मागे घ्यावा, वन जमीन, महसूल जमीन, तसेच देवस्थान इनामी जमीन कसत असणाऱ्यांचा नावे करावी, आदिवासींचे प्रलंबित दावे निकालात काढावे, इतर पारंपरिक वनजमीन करणाऱ्यांना या कायद्यातील तीन पिढ्यांची असलेली अट रद्द करावी, कोरोना लॉकडाउन काळातील जनतेचे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, या मागण्या करण्यात आल्या. 

या आंदोलनात कॉ. किसन गुजर, अर्जुन आडे, शंकर सिडाम, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, खंडेराव कानडे, अनिल आडे, प्रभाकर बोड्डेवार, मधुकर राठोड, जनार्दन काळे, नंदू मोदुकवार, मनोज सल्लावार, स्टॅलिन आडे, अबंर चव्हाण, वसंत कोडमेते, मडावी, शेषराव ढोले, दादाराव टारपे, विजय गाभणे आदिनी सहभाग घेतला.


इतर ताज्या घडामोडी
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी...नाशिक : ‘‘शेती व शेतीच्या व्यवस्थापनात महिलांचे...
बर्ड फ्लूच्या सूचनांचे पालन करावे ः पंकेअंबाजोगाई, जि. बीड : ‘‘प्रशासनाकडून वेळोवेळी...
वायनरी, पैठणी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू...नाशिक : ‘‘पुणे विद्यापीठाच्या नाशिक...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून...पुणे : ‘कृषिक २०२१’ निमित्ताने बारामतीच्या...
वातावरणपूरक संत्रा जातींचे संवर्धन करा...अकोला : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः...
कारखान्यांनी सीएनजी गॅसही तयार करावा :...शिराळा, जि. सांगली : राज्याला समृद्धीच्या...
कायदे मागे घेण्यास भाग पाडू : किसान सभानाशिक: केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग...
अण्णांनी उपोषण करू नये : फडणवीसराळेगणसिद्धी, जि. नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा...
‘शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करा’पुणे ः ‘‘राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे...
भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही...नगर : भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत...
खानदेशात कडब्याची आवक वाढणारजळगाव ः खानदेशात यंदा रब्बी हंगामाची पेरणी...
‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा...सोलापूर : शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा...
भूजल स्रोत बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर...पुणे ः पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण...
हमाल नसतानाही मनमानी वसुली; शेतकऱ्याचा...नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न...
बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा...सोलापूर ः अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका...
शेतकरी नियोजन (पीक : हरभरा)सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तापमानात वाढ होण्याची शक्यताकमाल तापमान विदर्भात ३.१ अंश सेल्सिअसने, तर कोकण...