agriculture news in Marathi blue rice experiment in strawberry belt Maharashtra | Agrowon

स्ट्रॉबेरीच्या पट्ट्यात निळ्या भाताचा प्रयोग 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीच गोडवा देशभर पोहोचला असून, आता या तालुक्यात इंडोनेशियातील निळ्या भाताची प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. 

सातारा : महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीच गोडवा देशभर पोहोचला असून, आता या तालुक्यात इंडोनेशियातील निळ्या भाताची प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बिरमणी (ता. महाबळेश्‍वर) येथे या प्रयोगाचा प्रारंभ नुकताच झाला. 

महाबळेश्‍वर तालुक्यातील उपक्रमशील कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे यांनी महाबळेश्‍वरच्या मातीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिरमणी येथे प्रकाश मोरे यांच्या शेतात निळा भात हे पीक घेण्यात आले आहे. कृषी उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते भाताच्या निळ्या वाणाची पेरणी करण्यात आली. वाडा कुंभरोशी, बिरवाडी, भोसे, दानवली, पांगारीतील शेतकरीही हे उत्पादन घेणार आहेत. या वेळी दीपक बोर्डे यांनी निळ्या भाताच्या वाणाविषयी माहिती दिली.

हे वाण इंडोनेशिया देशातील आहे. आसामच्या काही शेतकऱ्यांनी या निळ्या भाताच्या वाणाची लागवड केली होती. २०१८ मध्ये नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीन किलो निळ्या भाताचे बियाणे लावले होते. त्यापासून दोन वर्षांत १४ क्विंटल बियाणे उत्पादित केले. त्यातील या वर्षीच्या बियाण्यातील ५० किलो बियाणे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

हा निळा भात खाण्यासाठी पौष्टिक आहे. पंचतारांकित हॉटेलात या वाणाला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाऱ्याने तो पडत नाही. एकरी २० ते २५ पोते साळ निघते. शिजवल्यावर तो जांभळा दिसतो. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदळात त्याची गणना होते. निळ्या भाताच्या पेरणीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कृषी अधिकारी श्री. दळवी, मंडल कृषी अधिकारी गोपाल बुधावले, कृषी सहायक रोहन निगडे, रणजित शिंदे, वामन मोरे, प्रदीप मोरे, गणपत मोरे, गोपीचंद घाडगे, सुभाष मोरे, सुरेंद्र मोरे, शरद मोरे व मंगला मोरे उपस्थित होते. 
 


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...