एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडलेली नौका गायब, पारंपरिक मच्छीमारांची कारवाईची मागणी

सिंधुदुर्गजिल्ह्यातील आचरा बंदरात २० वाव खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडलेली नौका गायब झाली आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौका मालकावर कारवाई करावी, या मागणीसाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धाव घेतली.
 एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडलेली नौका गायब, पारंपरिक मच्छीमारांची कारवाईची मागणी Boats caught while fishing by LED disappear, demanding action by traditional fishermen
एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडलेली नौका गायब, पारंपरिक मच्छीमारांची कारवाईची मागणी Boats caught while fishing by LED disappear, demanding action by traditional fishermen

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यातील आचरा बंदरात २० वाव खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडलेली नौका गायब झाली आहे. त्यामुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौका मालकावर कारवाई करावी, या मागणीसाठी पारंपरिक मत्स्य व्यवसयिकांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धाव घेतली आहे. पकडलेली नौका गायब होतेच कशी, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

आचरा समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी करीत असलेल्या नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई करून ती नौका आचरा बंदरात ठेवली होती. त्यानंतर ठेवलेल्या ठिकाणावरून नौका गायब झाली. या संदर्भातील माहिती पांरपरिक मच्छीमारांना मिळताच त्यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या कार्यालयात धाव घेतली.

या वेळी कार्यालयात मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करगुंटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर उपस्थित होते. पांरपरिक मच्छीमार छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे, वसंत गावकर, सन्मेश परब, बाबी जोगी आदींनी मत्स्य विभागाने पकडलेली नौका समुद्रातून गायब होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com