बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा  अतिवृष्टीचा जोरदार तडाखा 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी ( ता.२५) रात्री एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे.
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा  अतिवृष्टीचा जोरदार तडाखा  Bodhegaon area for the third time Heavy rain
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा  अतिवृष्टीचा जोरदार तडाखा  Bodhegaon area for the third time Heavy rain

नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी ( ता.२५) रात्री एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेवगाव-गेवराई मार्गावरील काळा ओढ्यावरचा पूल पुरामुळे उखडल्याने वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे ठप्प झाली होती.  शेवगाव तालुक्यात अलीकडच्या काळात सातत्याने पावसाचा तडाखा बसत आहे. बोधेगावसह बालमटाकळी, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, आधोडी, आंतरवाली, दिवटे, हातगाव, कांबी, मुंगी व इतर गावांना या पूर्वी ३० ऑगस्ट, ४ सप्टेंबर असा दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. काल रात्री तिसऱ्यांदा पुन्हा शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाची बोधेगाव व चापडगाव अतिवृष्टीची नोंद झाली. एकाच महिन्यांत तीनदा अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, कांदा, ऊस आदी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानींचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. बोधेगाव मंडलात लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांसह राहती घरे, जनावरे, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानींचे सरसकट पंचनामे पूर्ण करून तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com